Latest

पुणे : मुंबई – बेंगळुरू महामार्गावर बावधन येथे खासगी प्रवासी बस उलटली

अमृता चौगुले

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  मुंबई बेंगळुरू बाह्यवळण मार्गावर बावधन सीएनजी पेट्रोल पंपाजवळ खासगी प्रवासी बस उलटून अपघात झाला. या अपघातात १० ते 12 प्रवासी जखमी झाले. मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास हा अपघात झाला. मुंबईकडून बेंगलोरकडे जाणाऱ्या खासगी बस निघाली होती. बसमधे एकूण ३६ प्रवासी होते. अग्निशमन दलाच्या जवानांनी धाव घेऊन मदतकार्य सुरू केले. जखमी प्रवाशांना रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मुंबईहून बंगलोरच्या दिशेने स्लीपर कोच असलेली ट्रॅव्हल्स निघाली होती. बावधन येथून बस चांदणी चौकाच्या दिशेने जाताना, चालकाचा बसवरील ताबा सुटला आणि बस लोखंडी सुरक्षा कठडा तोडून सर्व्हिस रोडवर येऊन पलटी झाली. यावेळी बसमधील प्रवाशी एकमेकांच्या अंगावर पडले. त्यामुळे अनेकांना दुखापत झाली असून, जखमींना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले.

10  ते 12 प्रवाशी जखमी आहेत. त्यांना बावधन येथील खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. पाषाण अग्निशमन केंद्र अधिकारी शिवाजी मेमाणे,वाहन चालक रमेश रणदिवे, फायरमन जवान किसन तरपाडे , गजानन बालगरे , शशिकांत धनवटे, मदतनीस जवान संकेत घोगरे, सौरभ पारखी यांनी महत्वाची कामगीरी बजावली. रात्री उशिरापर्यंत क्रेनद्वारे पलटी झालेली बस सरळ करण्याचे काम सुरू होते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT