Latest

नवी मुंबईतील महापे एमआयडीसीत केमिकल कंपनीला आग

मोहन कारंडे

नवी मुंबई: पुढारी वृतसेवा : नवी मुंबई महापे एमआयडीसीत आज गुरुवारी सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास प्लाॅट नंबर डब्लू ६ येथील मेहके या केमिकल कंपनीला आग लागली. या आगीत मोठ्या प्रमाणावर केमिकल असल्याने आगीचा भडका उडाला. आग कशामुळे लागली याबाबत अद्याप कुठलीही माहिती समजू शकलेली नाही.

एमआयडीसी, महापालिका अग्निशमन दलाचे बंब आग विजविण्यासाठी घटनास्थळी दाखल झाले आहे. आगीत कोणतीही जिवीतहानी झाली नसून नुकसान मोठ्या प्रमाणावर झाले आहे. आगीचे लोंढे पसरल्याने महापेजवळील लोकवस्तीला त्याच्या झळा जाणवल्या.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT