Latest

डायल ११२ क्रमांकावर पत्नीची हत्या केल्याची दिली खोटी माहिती

अनुराधा कोरवी

अकोला ; पुढारी वृत्तसेवा : खदान पोलिस स्टेशन हद्दीतील ख्वाजा अजमेरी उर्दू हायस्कूल सिंधी कॅम्प येथे पत्नीची हत्या केल्याची खोटी माहिती डायल ११२ क्रमांकावर दिली. यानंतर पोलिसांनी केलेल्या चौकशीअंती ही माहिती खोटी असल्याने आरोपीविरूध्द्ध गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेतील इसमाचे नाव देवराव साठे (रा. सिंधी कॅम्प, खदान ) असे आहे.

संबंधित बातम्या 

२९ एप्रिल रोजी खदान पोलिस कर्तव्यावर असताना देवरात साठे याने मोबाईल फोनवरून नऊ इसमासोबत मिळून ख्वाजा अजमेरी उर्दू हायस्कूल सिंधी कॅम्प येथे पत्नीची हत्या केल्याची माहिती दिली होती. यानंतर फिर्यादी पोलिस अंमलदार देवेंद्र श्रीकृष्ण चव्हाण याना एमडीटीवर माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळी भेट दिली आणि चौकशी केली.

सुरूवातीला देवरात साठे याने पोलिसांना उडवा उडवीची, असमाधानकारक उत्तरे दिली. नंतर मात्र, स्वत : च मोबाईलवरून डायल ११२ क्रमांकावर फोन केल्याचे सांगितले. तसेच सदर ठिकाणी पाहणी केली असता, असा कोणताही प्रकार घडला नसल्याचे दिसून आले.
साठे याने पोलिसांना शासकीय कर्तव्य करीत असताना मोबाइलवरून कॉल करून त्रास देण्याच्या उद्देशाने खोटी माहिती दिल्याने त्याच्याविरुध्द खदान पोलिस स्टेशनमध्ये कलम १८२ भारतीय दंड संहिताप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

SCROLL FOR NEXT