Latest

Ted Bundy : ३० मुलींचे मुंडके कापून घर सजविणारा बलात्करी डेट बंटी माहितीय का?

backup backup

पुढारी ऑनलाईन डेस्क

जगातील गुन्ह्यांचा काळा इतिहास चाळला तरी, आजदेखील अंगावर काटा येतो. हत्या, खून, दरोडा, बलात्कार, असे गुन्हे करून वेगळा इतिहास घडविणारे गुन्हेगार जगाच्या इतिहासात काही कमी नाहीत. मूळात आपल्या कृत्यानेच हे अजराअमर झालेले आहेत. लोकं त्यांचं नाव घेणं ही टाळतात. (Ted Bundy)

आज अशाच एका खतरनाक सीरियल किलरच्या अमानुषतेची गोष्ट जाणून घेणार आहोत, ज्याने ३० हून अधिक तरुणी आणि महिलांवर क्रूरपणे बलात्कार करून निर्घृण हत्या केली. इतकंच नाही तर, संबंधित महिलेवर तिचं शरीर सडेपर्यंत बलात्कार करायचा आणि नंतर मुंडकं कापून घरामध्ये ट्राॅफीसारखं सजवून ठेवायचा. उरलेल्या शरीराचे छोटे-छोटे तुकडे करून नाला-गटारीत फेकून द्यायचा… चला तर जाणून घेऊ… हा क्रूर मनुष्य आहे तरी कोण?

मानसशास्त्राचं आणि वकिलीचं शिक्षण पूर्ण केलेला… दिसायला हॅण्डसम… पेशाने फिजीकल फिटनेस ट्रेनर… वयानेही तरुणच… त्याच्या सुंदरतेकडे पाहूनच मुली आणि महिला त्याच्या प्रेमात पडायच्या… तोही फ्लर्ट करून मुलींना आपल्या जाळ्यात ओढायचा… नंतर संबंधित मुलीला घरी घेऊ जायचा आणि तिच्यावर वारंवार बलात्कार करायचा… या हॅण्डसम पुरुषाचं नाव आहे थियोडोर राॅबर्ट बंटी. (Ted Bundy)

जग त्याला टेड बंटी नावानं ओळखतं. महिलांची लागोपाठ हत्या करणं, मुलीचं अपहरण करणं, चोऱ्या करणं, असे कित्येक आरोप या खतरनाक टेड बंडीवर होते. त्याच्या मृत्यूची शिक्षादेखील त्याच्या कृत्यासारखी देण्यात आली होती. आपल लेखाच्या शेवटी त्याच्या शिक्षेबद्दल जाणून घेऊच…

टेड बंटीचा जन्म  २४ नोव्हेंबर १९४६ साली अमेरिकेतील बर्लिंग्टन येथे झाला होता. शाळा-काॅलेजमधील तरुणी त्याला खूप आवडत असत. फिजीकल फिटनेस ट्रेनर असल्याने मुलींनाही तो आवडायचा. फ्लर्ट करत तो मुलींना आपल्या जाळ्यात ओढायचा. तो १२ ते २२ वर्षांच्या मुलींचे अपहरण करत असे.

फेब्रुवारी १९७३ मध्ये अमेरिकेच्या सिएटल शहरात काॅलेजमध्ये शिकत असणाऱ्या २१ वर्षीय लिंडा हेली नावाच्या मुलीचं अपहरण केलं. तिच्यावर सलगपणे तिच्यावर बलात्कार केला. नंतर तिच्या शरीराचे तुकडे केले आणि तिचं मुंडकं कापून स्वतःजवळ ठेवलं. उरलेलं शरीर नाल्यामध्ये फेकून दिलं. त्यापूर्वी १९ वर्षीय डोना हिच्यासहीत अन्य मुलींनाही टार्गेट केले होते.

टेड बंटीने १९७३ पासून १९७८ पर्यंत जवळ-जवळ ३० मुलींचे अपहरण केले होते. काही परदेशी माध्यमं टेड बंटीबद्दल सांगतात की, तो आपल्या आकर्षक दिसण्याचा फायदा घेऊन मुलींना जाळ्यात ओढत होता. त्यांचं अपहरण करून त्याच्या खोलीमध्ये न्यायचा. त्यांच्या अमानुष बलात्कार करायचा. नंतर त्यांची मान कापून घरात ट्राॅफीसारखं सजवून ठेवायचा. त्याने त्याच्या खोलीमध्ये १२ हून अधिक मुलीचं मुंडकं कापून ठेवलेलं होतं.

इतके सीरियल किलिंग टेड बंटीने ५ वर्षांत केले होते. शेवटी १६ ऑगस्ट १९७५ मध्ये चेकिंग सुरू असताना पोलिसांच्या तावडीत बंटी सापडला. त्या रात्री बंटीला तुरुंगात टाकले. त्यावेळी त्याला ज्या खोलीमध्ये डांबलेले आले होते. त्या ठिकाणी त्याने आपली कपडे आणि पुस्तके अंथरुणात ठेवली, जणू काही टेड बंडी झोपलेला आहे, असा पोलिसांचा भास झाला. त्याचा फायदा घेत बंटी छत तोडून पळून गेला. नंतर पुन्हा एकदा त्याला पकडण्यात आले. मात्र, न्यायालयात हजर करण्यापूर्वीच पोलिसांना चकमा देत तो फरार झाला. अशा तब्बल तीन वेळा पोलिसांच्या तावडीतून पळून जाण्यात बंटी यशस्वी ठरलेला होता.

अखेर २४ जानेवारी १९८९ मध्ये टेड बंटीला पोलिसांनी अटक केली आणि न्यायालयाने त्याला मृत्यू शिक्षा ठोठावली. मात्र, ही शिक्षादेखील त्याच्या क्रूरतेसारखीच होती. ही शिक्षा होती एका इलेक्ट्राॅनिक खुर्चीवर बसवून शाॅक देऊन त्याचा मृत्यू घडवून आणायचा. ठरल्याप्रमाणे फ्लोरिडाच्या तुरुगात त्याला खुर्चीवर बसविण्यात आले आणि करंट सुरू करण्यात आला. त्यात टेड बंटीचा मृत्यू झाला आणि अमेरिकेतील ७ राज्यातील महिलांनी सुटकेचा श्वास सोडला.

पहा व्हिडीओ : Kolhapur Crime : आईचे तुकडे करणारा नराधम फासापर्यंत कसा पोहोचला?

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT