Latest

हिजाब परिधान केलेली महिला एक दिवस देशाची पंतप्रधान होईल : असदुद्दीन ओवैसी

Arun Patil

हैदराबाद, वृत्तसंस्था :  हिजाब परिधान केलेली महिला एक दिवस देशाची पंतप्रधान होणार असल्याचे भाकीत एमआयएमचे अध्यक्ष खा. असदुद्दीन ओवैसी यांनी रविवारी केले.

ते म्हणाले की, 2002 पासून पंतप्रधान नरेंद्र मोदी अल्पसंख्याकांचा तिरस्कार करीत आहेत. लोकसभा निवडणुकीत ते मुस्लिमांना टार्गेट करीत आहेत. मुस्लिम द्वेष हा त्यांचा डीएनए आहे. भाजपसह इंडिया आघाडीकडूनही मुस्लिम उमेदवारांना लोकसभेत जागा दिल्या जात नाहीत. लोकसभेतील मुस्लिमांचे प्रतिनिधित्व चिंताजनक असल्याची खंतही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

एक दिवस या देशाची पंतप्रधान हिजाब परिधान केलेली महिला असेल. कदाचित तो दिवस पाहण्यासाठी मी जिवंत नसेन, असेही त्यांनी मुस्लिम पंतप्रधानासंदर्भातील प्रश्नास उत्तर देताना सांगितले. अल्पसंख्याक समाजाचे तुष्टीकरण, आरक्षण, लोकसंख्या आदी मुद्द्यांवरून लोकसभा निवडणुकीचे वातावरण तापले असतानाच ओवैसी यांनी आता हिजाब घातलेल्या महिलेस देशाची पहिली पंतप्रधान करणार असल्याचे वक्तव्य केले आहे. भाजपने ओवैसी यांच्याविरोधात माधवी लता यांना उमेदवारी दिली आहे. ओवैसी यांच्या पक्षाकडून उत्तर प्रदेशात 20, महाराष्ट्रात 5, बिहारमध्ये 11 आणि झारखंडमध्ये काही जागांवर उमेदवार उभे करण्यात आले आहेत.

SCROLL FOR NEXT