Latest

जागतिक महिला दिनी मोदींकडून भेट! सिलेंडरच्या किंमतीमध्ये घट 

अंजली राऊत

नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क
जागतिक महिला दिन – 2024 निमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समस्त नारी शक्तीला छानसे गिफ्ट दिले आहे. खुद्द पंतप्रधानांनी घरगुती गॅस सिलेंडरची किंमत १०० रूपयांनी स्वस्त झाल्याची घोषणा केलेली आहे.

नारी शक्तीकरीता घरगुती गॅसची किंमत कमी झाल्याने त्यांना लाख मोलाची मदत होणार असून महिलांचे बजेट सांभाळण्यास त्यांना आता मोठी मदतच होणार आहे. ठरणार असल्याचे पंतप्रधानांनी स्पष्ट केले. महिलांचे जीवन सुसह्य करणे आणि त्यांच्या बळकटीकरणासाठी सरकार प्रयत्न असल्याचे मत पंतप्रधान मोदींनी सांगितले आहे. दरम्यान चालू मार्च महिन्याच्या सुरूवातीलाच एक मार्च रोजी सरकारी कंपन्यांनी व्यवसायिक गॅसच्या किंमतीत वाढ केलेली होती, त्यावेळी घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीत कोणताही बदल केलेला नव्हता. त्यात घरगुती गॅस सिलेंडरची किमत आता आणखी १०० रुपयांनी कमी झाल्याने गृहीणींचे असलेले मत जाणून घेऊया…

आठशे रुपयांनी आधी घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमती वाढवायच्या आणि आगामी निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर भोळ्या भाबड्या मतदार महिलांना आपल्या पक्षाकडे वळविण्यासाठी फक्त शंभर रुपये कमी करायचे. ही कोणत्य्या प्रकारची मदत ? असं मला वाटते. – मनिषा काकडे, नाशिक.

फूल ना फूलाची पाकळी असेना, १०० रुपये कमी झाले तरी थोडा फार आर्थिक भार कमी झाला आहे. त्यामुळे या निर्णयाचा मी स्वागत करत असून या निर्णयामुळे गरीबांच्या आर्थिक बजेटमध्ये थोडीशी बचत होणार आहे. त्यामुळे मी पंतप्रधान मोदी यांचे आभार मानते. – दीपाली राजगुरु, नाशिकरोड.

घरगुती गॅस सिलिंडरची किमत १०० रुपयांनी कमी होऊन वाढत्या महागाईचा डोंगर मात्र तसाच आहे. आज दैनंदिन लागणाऱ्या गोष्टी जसं डाळीसाळींचा खर्च आणि विविध वस्तूंवरील टॅक्स भरावा लागतो. कधी कधी महिना अखेर आर्थिक बजेट सांभाळता सांभाळता कसरत होते. – कविता भालेराव, शिखरेवाडी, नाशिकरोड

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT