Latest

Cookiecutter shark : जहाज बुडवणारी कुकीकटर शार्क!

Arun Patil

वॉशिंग्टन : समुद्रातील जहाजांना बुडवू शकेल, इतकी खतरनाक असणारी कुकीकटर शार्क इतकी छोटी आहे की, तिला याचमुळे दात असणारी पेन्सिल असे म्हटले जाते. ही शार्क अंधारात अधिक चमकते. या शार्कची लांबी 15 ते 20 सेेंटीमीटर इतकीच असते. पण, अगदी बडी बडी जहाजे तळाच्या बाजूने कुरतडून ती बुडून जातील, इतका उपद्रव माजवण्याची ताकद या शार्ककडे आहे. अलीकडेच अशा शार्कनी ऑस्ट्रेलियन किनारपट्टीवरील कैटा मरीन बुडवले.

डेली स्टारने दिलेल्या रिपोर्टनुसार, कुकी कटर शार्क हे एक शिकारी शार्क आहे. सदर शार्क अगदीच छोेटे असले तरी जवळपास प्रत्येक वस्तू खाण्याचा तिचा प्रयत्न असतो. यात पाणबुडी, जहाजे व अगदी केबरसारख्या चीजवस्तूही कुरतडून शक्य तितके गिळंकृत करण्यावर या शार्कचा भर असतो. सदर शार्कला मृत समुद्री जीवांचे मांस बिस्किटाच्या आकारात करत ते खाण्यासाठी ओळखले जाते. व्हेल किंवा डॉल्फिनसारखे समुद्री जीव मृतावस्थेत आढळतात, त्यावेळी कुकी कटर शार्क आपल्या अणकुचीदार दाताच्या सहाय्याने त्यांचे बिस्किटाच्या आकारासारखे तुकडा करून तो घेऊन जाते आणि सातत्याने असेच करत राहते, असे बाँड युनिव्हर्सिटीमध्ये एनव्हायर्नमेंटल सायन्सचेे प्रा. डॅरेल मॅफी सांगतात.

अगदी अलीकडे 6 सप्टेंबरला या शार्कने ऑस्ट्रेलियन किनार्‍यावर कैटा मरिनला छेद केले, त्यावेळी त्या बोटीत तिघे नाविक अडकून पडले होते. नंतर त्यांची यातून सुरक्षित सुटका करण्यात आली. जहाज मात्र पाणी घुसून सागराच्या तळाशी विसावले.

SCROLL FOR NEXT