पुढारी ऑनलाईन डेस्क : साऊथचा सुपरस्टार अल्लू अर्जुन 'पुष्पा २' चित्रपटामुळे खूपच चर्चेत आला आहे. नुकतेच या चित्रपटातील पहिले गाणे रिलीज झाले आणि त्याच्या स्वॅगने चाहत्यांची मने जिंकली. याच दरम्यान अभिनेता अल्लू अर्जूनच्या चाहत्यांना एक धक्कादायक वृत्त समोर आलं आहे. अल्लू अर्जूनवर नुकतेच आंध्र प्रदेश पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, लोकसभा निवडणुकीसोबत आंध्र प्रदेशमध्ये विधानसभेच्या निवडणुकाही होणार आहेत. याच दरम्यान अभिनेता अल्लू अर्जुन यांचा मित्र आणि वायएसआरसीपी, आमदार रवि चंद्र किशोर रेड्डी यांच्या प्रचारासाठी गेले होते. शिल्पा रवी नानघल हे आंध्र प्रदेशमधील एका मतदार संघातून निवडणुकीस उभे राहिले आहेत. निवडणूक प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अल्लू अर्जून मित्राला पाठिंबा देण्यासाठी तेथे पोहोचला होता. दरम्यान अल्लू अर्जूनला पाहण्यासाठी चाहत्यांनी तुफान गर्दी केली. यामुळे आमदारांच्या घराबाहेर फॅन्सची मोठी गर्दी झाली.
आंध्र प्रदेशात निवडणुकीच्या वातावरणामुळे आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. दरम्यान आमदारांच्या घराबाहेर मोठी गर्दी झाल्याने त्यावर नियंत्रण ठेवणे कठीण झाले. यामुळे आंध्र प्रदेश पोलिसांनी अल्लू अर्जुन आणि आमदार रवि चंद्र किशोर रेड्डी याच्यावर गुन्हा दाखल केला.
यावेळी शेअर केलेल्या व्हिडिओत अल्लू अर्जूनने "शिल्पा रवी नानघल यांना पाठिंबा देण्यासाठी येथे आलो आहे. आणि माझ्या शुभेच्छा त्याच्यासोबत आहेत." असेही म्हटलं आहे.
हेही वाचा