Latest

Flood in California: जगातील उष्ण ठिकाणी एकाचवेळी वर्षभराचा पाऊस कोसळला, महापूराने हाहाकार

मोनिका क्षीरसागर

पुढारी ऑनलाईन: कॅलिफोर्नियातील डेथ व्हॅली नॅशनल पार्क हे जगातील सर्वाधिक कोरडे आणि उष्णतेचे ठिकाण म्हणून ओळखले जाते. याठिकाणी गेल्या आठवड्यात ०.०४ इंच पाऊस झाला; पण ६ ऑगस्टच्या सकाळी अचानक अतिवृष्टी येथील नागरिकांना पाहायला मिळाले. अचानक कोसळलेल्या पावसाच्या पाण्याने सर्वत्र रौद्ररूप धारण केले. अचानक पाणी वाढल्याने महापूर आला.

डेथ व्हॅलीमध्ये पूर परिस्थिती जैसे थे आहे. अचानक झालेल्या मुसळधार पावसाने येथे महापूर आला. यामध्ये १००० हून अधिक लोक पूराच्या पाण्यात अडकले असून, गाड्यांचे मोठे नुकसान झाले आहे. येथील अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, पार्कच्या नेवाडा-कॅलिफोर्निया सीमेजवळील फर्नेस क्रीक भागात 1.7 इंच पाऊस पडला.  एकाचवेळी वर्षभराचा पाऊस पडला आहे.

Fiood in Death Valley National Park

अधिकाऱ्यांनी सांगितले की, सुमारे ६० गाड्या  पूराच्या पाण्यात बुडल्या. येथील ५०० नागरिक आणि ५०० पार्क कर्मचारी  पूरात अडकलेले आहेत. पूरपरिस्थितीत अद्याप कोणीही जखमी किंवा कोणत्याही प्रकारची जिवीतहानी झालेली नाही. कॅलिफॉर्निया येथील वाहतूक विभागाने म्हटले आहे की, पार्कच्या मुख्य मार्गावरील पूरामुळे आलेला कचरा साफ करण्यासाठी सहा तासाहून अधिक वेळ लागला. यानंतर अडकेलेल्या नागरिकांना अथक प्रयत्न करून  याठीकाणाहून बाहेर काढण्यात आले. डेथ व्हॅली नॅशनल पार्कचे सर्व मार्ग बंद करण्यात आले आहेत. या मार्गावरील स्वच्छतेचे काम सध्या सुरू आहे. पार्कच्या साफसफाईनंतर येथील सुरक्षा तपासूनच पुन्हा हा पार्क सुरू करण्यात येणार असल्याचे स्थानिक प्रशासनाने म्हटलं आहे.

Fiood in Death Valley National Park

हवेतील आर्द्रता वाढल्याने अतिवृष्टी

हवामान तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार उद्यानाच्या सभोवतालचे तापमान जास्त असल्याने पारा १.१ अंश सेल्सिअसने वाढला होता. या प्रदेशातील सरासरी तापमान दरवर्षी वेगाने वाढत आहे. हे जगातील सर्वात उष्ण आणि धोकादायक क्षेत्र मानले जाते. हवेतील आर्द्रता 7 टक्क्यांनी वाढली होती. त्यामुळे इतका मोठा पाऊस पडला आणि पूरपरिस्थिती निर्माण झाल्याचे तज्ज्ञ सांगतात. हवामान बदलामुळे समुद्राची पातळीही झपाट्याने वाढत आहे. त्याचा परिणाम कॅलिफोर्नियातील अनेक भागात जाणवत आहे. समुद्राची पातळी वाढल्यास हवेतील आर्द्रता वाढते आणि त्यामुळे पावसाची शक्यता दाट असते. 2050 पर्यंत, महासागरांमध्ये भरती-ओहोटीचे प्रमाण देखील वाढेल, असे हवामान तज्ज्ञांचे मत आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT