Latest

2000 च्या 97.69% चलनी नोटा परत आल्या, पण 8 हजार कोटींच्या नोटा अजूनही लोकांकडे : RBI

backup backup

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) सोमवारी 2000 रुपयांच्या नोटांबाबत महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे. यामध्ये 97.69 टक्के नोटा बँकिंग सिस्टीममध्ये परत आल्याचे सांगितले आहे. त्याचबरोबर काढलेल्या नोटांपैकी केवळ 8,202 कोटी रुपयांच्या नोटा अजूनही लोकांकडे असल्याचे सांगण्यात आले आहे.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने 28 मार्च रोजी सांगितले की, 2000 रुपयांच्या नोटा बदलण्याची आणि ठेवण्याची सुविधा आरबीआयच्या 19 इश्यू ऑफिसमध्ये 1 एप्रिल रोजी सुविधा बंद असेल. आर्थिक वर्ष सुरुवात असल्यामुळे प्रलंबिंत कामे आणि नवीन धोरणांमुळे या दिवशी ही सुविधा उपलब्ध नसेल असे सांगण्यात आले. मात्र ही सुविधा 2 एप्रिलपासून पुन्हा सुरू होईल, असेही आरबीआयने प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

आरबीआयने 19 मे 2023 रोजी देशातील चलनातील सर्वात मोठी करन्सी नोट असलेल्या 2000 रुपयांची नोट चलनातून बंद करण्याचा निर्णय घेतला होता. या घोषणेनंतर चलनात असलेल्या 2,000 रुपयांच्या नोटांचे एकूण मुल्य पाहिले तर 19 मे 2023 रोजी 3.56 लाख कोटी रुपये इतके असल्याची माहिती आहे. भारतीय रिझर्व्ह बॅंकने क्लीन नोट पॉलिसी अंतर्गत हा निर्णय घेतला होता. या दोन हजार रुपयांच्या नोटांना बदलण्यासाठी 7 ऑक्टोबर 2023 पर्यंत मुदत देण्यात आली होती. देशातील सर्व बॅंकांमध्ये या नोटा बदलण्याची मुभा दिली होती. आता सर्वसामान्य बॅंका आणि इतर ठिकाणी या 2000 च्या नोटा परत करण्याची सुविधा आता बंद केलेली आहे. जर कोणाला 2000 रुपयांच्या नोटा बदलायच्या असतील तर त्या नोटांना पोस्टाद्वारे रिझर्व्ह बॅंकेकडे पाठवाव्या लागणार आहेत.

SCROLL FOR NEXT