Latest

सांगली : क्रिप्टो करन्सीच्या बहाण्याने 9.37 लाखांचा गंडा

Arun Patil

सांगली, पुढारी वृत्तसेवा : क्रिप्टो करन्सीमधील रेथर नावाचे चलन देण्याच्या बहाण्याने नेट बँकिंगद्वारे एकाची 9 लाख 37 हजार 250 रुपयांची फसवणूक करण्यात आली. हा प्रकार दि. 21 नोव्हेंबर 2022 रोजी घडला आहे. याप्रकरणी निलेश विलास शहा यांनी सांगली शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सावनकुमार जगदीशभाई भाटी (रा. सुरत, गुजरात) यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. निलेश शहा हे उत्तर शिवाजीनगर येथे राहतात.

क्रिप्टो करन्सीमधील रेथर नावाचे चलन देण्यासाठी संशयित आणि शहा यांच्यामध्ये बोलणे सुरु होते. 21 नोव्हेंबर 2022 रोजी शहा यांच्या फोनवर संशयित भाटी याने फोन केला. सदरचे रेथर चलन हे फायनान्स अ‍ॅपवर पाठवतो असे सांगून नेटबँकिंगद्वारे फेडरल बँक, कराड अर्बन बँक आणि एचडीएफसी बँकेच्या खात्यावरून 9 लाख 37 हजार 250 रुपये इतकी रक्कम काढून घेतली. रकमेच्या बदल्यात त्यांनी सांगितल्याप्रमाणे क्रिप्टो करन्सी मधील चलनाचे 11 हजार 500 युनिट, 81.50 प्रति चलन या प्रमाणे शहा यांच्या फायनान्स अँपवर न पाठविता फसवणूक केली. पैसे घेऊनही अनेक महिने उलटले तरी अद्याप चलन मिळाले नसल्याने त्यांनी संशयित भाटी याच्याशी संपर्क साधला असता त्याने टाळाटाळ केली. फसवणुकीचा प्रकार निदर्शनास येताच शहा यांनी सांगली शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीनुसार सावनकुमार भाटी याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आली आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT