Latest

मानधन वाढीसाठी ८ हजार निवासी डॉक्टरांचा पुन्हा संप

backup backup

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : राज्यभरात ८ हजार निवासी डॉक्टरांनी आपल्या मागण्यांसाठी आजपासून संप पुकारला आहे. नागपुरातील मेयो,मेडिकलमधील रुग्णसेवेला या संपाचा फटका बसण्याची शक्यता आहे. मानधनात वाढ आणि हॉस्टेलमध्ये चांगली सुविधा या प्रमुख मागण्यांसाठी निवासी डॉक्टर संप करीत आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी हा संप मागे घेण्याचं आवाहन केलं होतं पण निवासी डॉक्टर संपावर ठाम आहेत. यापूर्वीही सरकारने दिलेला शब्द पाळला नाही असा मार्डचा आरोप आहे. विषेश म्हणजे एकाच महिन्यात निवासी डॉक्टर दोन वेळा संपात सहभागी झाले आहेत. मुंबईतील जे जे हॉस्पिटलमधील निवासी डॉक्टर देखील संपात सहभागी झाले आहेत. मासिक मानधनात १० हजारांची वाढ मागितली मात्र अजून त्यात वाढ झालेली नाही. जोपर्यंत मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत संप चालू राहणार असल्याचा इशारा डॉ संपत सूर्यवंशी, प्रवीणकुमार इंगळे, सचिन बळकुंदे आदींनी दिला आहे.

SCROLL FOR NEXT