Latest

जिनोम सिक्वेनिंगमध्ये डेल्टा व्हेरिअंटचे ७५ तर ‘डेल्टा डेरिव्हेटीव्हचे २५ टक्के रुग्ण

backup backup

मुंबई, पुढारी वृत्तसेवा : जिनोम सिक्वेनिंग चाचणीचे निष्कर्ष जाहीर करण्यात आले आहेत. मुंबईतील एकूण २८१ रुग्णांमधील कोविड विषाणू नमुन्यांचा अभ्यास करण्यात आला आहे. यात 'डेल्टा व्हेरिअंट'चे ७५ टक्के तर 'डेल्टा डेरिव्हेटीव्ह' चे २५ टक्के रुग्ण आढळले आहेत. २८१ पैकी ४ रुग्णांचा मृत्यू झाला असून या चारही जणांनी कोविड लसीचा एकही डोस घेतला नव्हता. तसेच त्यांचे वयदेखील ६० वर्षांपेक्षा अधिक होते. तर लस घेतलेल्यांपैकी एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही.

SCROLL FOR NEXT