Latest

Nanded Hospital News | नांदेडच्या सरकारी रूग्‍णालयात आणखी ७ मृत्‍यू; मृतांची संख्या ३१ वर पोहोचली

निलेश पोतदार

नांदेड : पुढारी वृत्‍तसेवा, नांदेड येथील डॉ शंकरराव चव्हाण मेडिकल शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात एका दिवसात २४ मृत्यू झालेले असतानाच सोमवारी रात्रीपासून चार नवजात बालकांसह सात रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मागील दोन दिवसांत मृतांची संख्या ३१ झाली आहे. (Nanded Hospital News)

दरम्यान, नांदेड येथे छत्रपती संभाजीनगर येथून तातडीने डॉक्टरांचे पथक पाठविण्यात आले आहे. या शिवाय वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ दुपारी तीन वाजता रुग्णालयाला भेट देणार आहेत. दरम्यान या ठिकाणी सहा जिल्ह्यातून दररोज दाखल होणाऱ्या अनेक गंभीर रुग्णांची संख्या पाहता येथे पुरेसा औषधी साठा व तज्ज्ञ डॉक्टरांच्या सक्षम टिमसह दर्जा आणि सुविधांची वाढ होणे आवश्यक आहे. (maharashtra hospital death)

भाजपाचे खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांची याबाबत वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. दिलीप म्हैसेकर यांच्याशी चर्चा झाली आहे. (Nanded Hospital News)

डॉ.शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयामधील सुविधा, औषधीसाठा दर्जा आणि तज्ञ डॉक्टरांच्या मनुष्यबळांची संख्या वाढविली पाहिली. याबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्यासोबत सोमवारी चर्चा केली असून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच वैद्यकीय शिक्षण मंत्री.हसन मुश्रीफ यांच्याकडेही हा विषय मांडणार असल्याचे खा. चिखलीकर यांनी सांगितले. (Maharashtra Hospital News)

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT