Latest

67 th National Film Awards : रजनीकांत यांना दादासाहेब फाळके पुरस्कार, कंगना सर्वोत्कृष्ट अभिनेत्री

स्वालिया न. शिकलगार

नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन :

६७ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराचा (67 th National Film Awards) आज वितरण सोहळा पार पडला आहे. उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते विजेत्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. हिंदी चित्रपटांच्या विभागात कंगना राणावतला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. दोन चित्रपटांसाठी हा पुरस्कार आहे. तर दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या 'छिछोरे' या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपट हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. (67 th National Film Awards)

कंगनाला 'मणिकर्णिका' आणि 'पंगा' या चित्रपटासाठी ही राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. अक्षय कुमारच्या केसरी या चित्रपटातील 'तेरी मिट्टी' या गाण्याचे पार्श्वगायक बी प्राक यांना गाण्यासाठी सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक म्हणून पुरस्कार मिळाला.

रजनीकांत दादासाहेब पुरस्काराने सन्मानित

चित्रपटसृष्टीतील योगदानाबद्दल केंद्र सरकारतर्फे दिला जाणारा ५१ वा दादासाहेब फाळके पुरस्काराने सुपरस्टार रजनीकांत यांना गौरवण्यात आलं. या सन्मानाबद्दल रजनीकांत यांनी आपल्या सोशल मीडियावरून आनंद व्यक्त केला. रजनीकांत यांनी याबद्दल ट्वीट करत चाहत्यांना माहिती दिली होती. रजनीकांत यांनी ट्वीट करत सरकारचे आभार मानले होते.

आसुरनसाठी धनुषला पुरस्कार

आसुरन या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून साऊथ स्टार धनुषला सनामानित करण्यात आले. सिक्किमला चित्रपटांसाठी अनुकूल राज्य म्हणजेच (मोस्ट फिल्म फ्रेंडली स्टेट) या पुरस्काराने गौरवण्यात आले. 'मरक्कर-अराबिक्कदालिन्ते-सिम्हम' या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट फिचर फिल्मचा पुस्कार मिळाला.

आनंदी गोपाळ या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्काराने गौरवण्यात आले. बॉलिवूड अभिनेता मनोज बाजपेयी यांना सर्वोत्कृष्ट अभिनेता हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. तर 'महर्षि' हा चित्रपटाला सर्वोत्कृष्ट लोकप्रिय चित्रपट पुरस्काराने गौरवण्यात आले.

सावनी रविंद्र
SCROLL FOR NEXT