Latest

Philippine Earthquake : फिलिपिन्समध्ये भूकंप! ६.८ रिश्टर स्केल तीव्रतेचे धक्के!

backup backup

पुढारी ऑनलाईन डेस्क : फिलिपिन्समध्ये भूकंपाचे झटके जाणवले आहेत. दक्षिण पूर्व मध्ये असलेल्या पिनिली पासून नऊ किलोमीटर अंतरावर हे भूकंपाचे धक्के जाणवले. ६.८ रिश्कर स्केल इतक्या तीव्रतेचे हे धक्के जाणवले असल्याची प्राथमिक माहिती आहे. त्याचबरोबर लुझोन या बेटावर देखील मंगळवारी ६.२ तीव्रतेचा भूकंप झाला, असे युरोपीयन भूमध्य भूकंप विज्ञान केंद्राने (EMSC) सांगितले.
(Philippine Earthquake)

फिलिपिन्समध्ये मंगळवारी ( दि. २५) तेथील स्थानिक वेळेनूसार ३ वाजून २४ मिनिटांनी भूकंप झाला. या भूकंपामुळे झालेल्या नुकसानीची अद्याप माहिती दिली नाही. मात्र हा भूकंप मोठ्या तीव्रतेचा असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे सावट पसरले आहे. (Philippine Earthquake)

जुलैमध्ये बसला होता ७.१ चा धक्का

यापूर्वी २०२२ च्या जुलै फिलिपिन्स मध्ये लुझोन बेटावर ७.१ रिश्टर स्केलचा तीव्रतेचा भूकंप झाला होता. राजधानी मनिलासह अनेक भागात जोरदार हादरे जाणवले होते.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT