Latest

54th IFFI : सुवर्ण मयूर पुरस्‍काराच्या स्‍पर्धेत कांतारा, सना, मिरबीनसह १२ आंतरराष्‍ट्रीय चित्रपटांचा समावेश

निलेश पोतदार

पणजी : प्रभाकर धुरी गोव्यात सुरू असलेल्या 54 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात प्रतिष्ठित सुवर्ण मयूर पुरस्कारासाठी 15 निवडक चित्रपटांमध्ये स्पर्धा रंगणार आहे. यामध्ये 12 आंतरराष्ट्रीय आणि 3 भारतीय चित्रपटांचा समावेश आहे.

चित्रपट निर्मितीतील उत्कृष्टतेला दाद देणारा सुवर्ण मयूर पुरस्कार हा जगातील प्रतिष्ठित चित्रपट सन्मानांपैकी एक आहे. या वर्षीच्या ज्युरीमध्ये स्पॅनिश सिनेमॅटोग्राफर जोस लुईस अल्केन, फ्रेंच चित्रपट निर्माते जेरोम पेलार्ड आणि कॅथरीन दुसार्ट, ऑस्ट्रेलियन चित्रपट निर्मात्या हेलन लीक यांच्यासह बनलेल्या ज्युरी पॅनेलचे अध्यक्ष ख्यातनाम भारतीय चित्रपट दिग्दर्शक शेखर कपूर आहेत.

या वर्षीच्या स्पर्धेत. चढाओढ चुरशीची असल्यामुळे अपेक्षा वाढल्या आहेत यावेळचे चित्रपट आहेत – 1)वूमन ऑफ ( मूळ नाव -कोबीटा झेड ) 2)द अदर विडो (मूळ नाव -पिलेगेश )3)द पार्टी ऑफ फुल्स (मूळ नाव -कॅप्टिव्हज )4)मेजर्स ऑफ मेन (मूळ नाव -डेर वर्मेसेन मेन्श ) 5)लुबो 6)हॉफमन्स फेरी टेल्स( मूळ नाव – स्काझकी गोफमाना )7)एन्डलेस बॉर्डर्स (मूळ नाव -मरझाये बाय पायन ) 8)डाय बिफोर डेथ (मूळ नाव- उमरे प्रिजे ) 9)बोसनियन पॉट (मूळ नाव- बोसांस्की लोनाक )10 )ब्लागाज लेसन्स (मूळ नाव -उरोतसीते ना ब्लागा ) 11)असोग 12) अंद्रायोगी 13)कंतारा 14)सना 15)मिरबीन

कांतारा (2022)

निर्माता व अभिनेता ऋषभ शेट्टी यांचा ब्लॉकबस्टर, 'कंतारा' दक्षिण कन्नड जिल्ह्यातील काल्पनिक गावात चित्रित केला आहे. हा चित्रपट मानव आणि निसर्ग यांच्यातील वैचारिक संघर्षाचा शोध घेतो. जंगलासोबत राहणाऱ्या जमातीच्या सह-अस्तित्वाला वनअधिकाऱ्यामुळे बाधा येते, ज्याला असे वाटते की, या जमाती पाळत असलेल्या काही प्रथा आणि रीतिरिवाज यामुळे निसर्गाला धोका निर्माण झाला आहे. मुख्य पात्र शिवा त्याचे अस्तित्व राखत गावातील शांतता आणि एकोपा पुन्हा प्रस्थापित करू शकेल का हा चित्रपटाचा मुख्य गाभा आहे.

सना (2023)

सुधांशू सारिया हे राष्ट्रीय पुरस्कार विजेते चित्रपट निर्माते आहेत. 'लव्ह' नावाच्या विचित्र रोड-ट्रिप रोमान्सद्वारे त्याने चित्रपटात पदार्पण केले. ज्याची चित्रपट महोत्सवांमध्ये मोठ्या प्रमाणात प्रशंसा झाली. या चित्रपटात, मुंबईत काम करणारी 28 वर्षीय आर्थिक सल्लागार सना हिला ती गर्भवती असल्याचे समजते. गर्भधारणा संपुष्टात आणण्याच्या तिच्या निर्णयावर ती ठाम आहे, गर्भपात करण्याची वास्तविक प्रक्रिया सनाला तिच्या जीवनाचे पुनर्मूल्यांकन करण्यास भाग पाडते आणि तिने घेतलेला निर्णय खरोखरच तिचा स्वत: चा आहे का याचा सखोल विचार करते.

मिरबीन (2023)

मीरबीन', मृदुल गुप्ता द्वारा दिग्दर्शित आणि धनिराम टिसो द्वारा निर्मित कार्बी चित्रपट फिचर फिल्म श्रेणीमध्ये निवडण्यात आला असून, प्रतिष्ठित महोत्सवात स्थान मिळविणारा आसाममधील एकमेव चित्रपट आहे.

मीरबीन हे या कथेचे मध्यवर्ती पात्र आहे. तिच्या बालपणी तिची आजी तिच्या मनात सर्दीहुन (कार्बी आदिवासी समजुतींमधील कापडाचा देव) च्या परीकथांप्रमाणे काहीतरी करण्याचे स्वप्न रुजवते, ज्यामुळे तिच्या मनात जीवन अर्थपूर्ण बनवण्याची इच्छा निर्माण होते. मात्र 2005 मध्ये भ्रातृहत्या आणि जातीय संघर्षांमुळे संपूर्ण कार्बी भूमी रक्तरंजित झाली आणि तिचा जीवही धोक्यात आला. उत्कृष्ट चित्रपटांची ही काळजीपूर्वक निवड विविध शैली आणि सांस्कृतिक पद्धतींचे प्रतिनिधित्व करते.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT