Latest

Lok Sabha Election 2024 : हिंगोली लोकसभा मतदारसंघात सायंकाळी ५ पर्यंत ५२ टक्के मतदान

निलेश पोतदार

हिंगोली, पुढारी वृत्तसेवा : हिंगोली लोकसभा मतदार संघात सायंकाळी 5 वाजेपर्यंत 52.03 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिली.

यामध्ये वसमत विधानसभा मतदार संघ 53.35, हदगाव 49.85, हिंगोली 53.42, कळमनुरी 52.60, किनवट 54.37 आणि उमरखेड विधानसभा मतदार संघात 48.64 टक्के मतदान झाले आहे. लोकसभा मतदार संघात सकाळी 3 वाजेपर्यंत 40.50 टक्के मतदान झाले होते.

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT