Latest

कोल्हापूर : घुणकी येथे महिलेचा गळा आवळून अमानुष खून

स्वालिया न. शिकलगार

किणी (पुढारी वृत्तसेवा) – घुणकी (ता. हातकणंगले) येथे शेतात जनावरे चारण्यासाठी गेलेल्या सुषमा अशोक जाधव -सनदे (वय ३८) या महिलेचा गळा आवळून खून झाल्याचे उघडकीस आले. काल सकाळपासून ती बेपत्ता होती. वडगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भैरव तळेकर सहकऱ्यासह घटनास्थळी दाखल झाले आहेत.

घुणकी येथील सुषमा जाधव कधी कधी शेतात जनावरे चारण्यासाठी घेऊन जात असत. काल (गुरुवारी) सकाळी त्या जनावरे घेऊन सकाळी अकराच्या सुमारास घुणकी गावच्या उत्तरेस वारणा नदीच्या बाजूला असणाऱ्या 'डाग' नावाच्या भागात गेल्या होत्या. त्या परत न आल्यामुळे शोधाशोध सुरू होती.

आज सकाळी त्यांचा मृतदेह उसाच्या फडात आढळला. पोलीस पाटील संदीप तेली यांनी वडगाव पोलिसांत वर्दी दिली. त्यानुसार वडगाव पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. खून नेमका कुणी आणि कोणत्या कारणासाठी केला याचा तपास सुरू झाला आहे.

SCROLL FOR NEXT