Latest

धक्कादायक: पाच तुकडे केलेला आणि मुंडके नसलेला युवकाचा मृतदेह उजनी पाणलोट क्षेत्रात सापडला

अमृता चौगुले

भिगवण, पुढारी वृत्तसेवा: तीस वर्षीय युवकाचा धारदार शस्त्राने अतिशय क्रूरपणे खून झाल्याची घटना उघडकीस आली आहे. मुंडके नसलेल्या शरीराचे पाच तुकडे करून प्लस्टिक पिशवीत भरलेले विवस्त्र अवस्थेतील अनोळखी युवकाचे अवयव भिगवण पोलिसांना तक्रारवाडी गावानजीक उजनी पाणलोट क्षेत्रात आढळून आले आहेत.

यावरुन भिगवण पोलिसांनी अज्ञाताविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन अप्पर पोलीस अधीक्षक आनंद भोईटे, पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर ,भिगवणचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप पवार, पोलीस उपनिरीक्षक रुपेश कदम यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत.

याबाबत सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी( दि.९) भिगवण जवळील तक्रारवाडी गावानजीक उजनी पाणलोट क्षेत्रात अंदाजे ३० ते ३५ वयाच्या पुरुषाचा मानेपासून मुंडके वेगळे केलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. या मृतदेहाचे खांद्यापासून दोन्ही हात आणि मांडीपासुन दोन्ही पाय वेगळे केलेले शरीराचे अवयव निळ्या व पांढऱ्या रंगाच्या प्लस्टिक पिशवीत भरलेले मिळून आले. याबाबतची फिर्याद पोलीस पाटील अमर धुमाळ यांनी दिली आहे.

ओळखीसाठी खुणा

मिळालेल्या अवयवाच्या उजव्या हाताच्या मनगटाच्या पोटारीवर टॅटू काढलेला असुन, याबाबत कोणास माहिती असल्यास भिगवण पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

पोलीसांसमोर आव्हान

या गुढ व तेवढ्याच रहस्यमय क्रूर खुनाचा तसेच मुंडक्याचा तपास लावण्याचे मोठे आवाहन पोलीस यंत्रणेसमोर असून, अद्याप तरी पोलिसांच्या हाती कोणतेही धागेदोरे लागले नसल्याने या खुनाचे गूढ गुलदस्त्यात आहे.

SCROLL FOR NEXT