Latest

जालना – वीज प्रवाह उतरलेल्या खांबाला स्पर्श झाल्याने तरुणाचा मृत्यू

स्वालिया न. शिकलगार

भोकरदन (जालना) : भोकरदन तालुक्यातील बोरगाव जहांगीर येथील तरुण शेतकरी ईश्वर पुंजाराम दळवी (वय 27) याचा घराजवळील विद्युत खांबाला स्पर्श झाला. विजेचा जबरदस्त धक्का लागून त्याचा मृत्यू झाला.

गावकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ईश्वर दळवी हा सकाळी सहा वाजण्याच्या दरम्यान शेतातून दूध घेऊन घरी परतला. यादरम्यान घराजवळील असलेल्या एका विजेच्या खांबात रिमझिम पावसामुळे विज प्रवाह उतरलेला असताना अचानक त्याचा या खांबाला स्पर्श झाला व त्याला विजेचा जोरदार झटका लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.

यादरम्यान घरच्यांनी तो खाली कोसळल्यानंतर आरडाओरडा करून त्याला बाजूला ओढले यानंतर त्याला दवाखान्यात भरती केला असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. ईश्वर याचा दोन वर्षांपूर्वी विवाह झाला होता. तो प्रचंड मेहनती असल्याने घराची जबाबदारी त्याच्यावर होती.

SCROLL FOR NEXT