Latest

26/11 Terror Attack : भीषण दहशतवादी हल्ल्याचा थरार दाखवणारे ‘हे’ आहेत चित्रपट आणि मालिका

मोनिका क्षीरसागर

पुढारी ऑनलाईन डेस्क : पाकिस्तानातील दहशतवादी संघटनेच्या सदस्यांनी २६ नोव्हेंबर, २००८ ला मुंबईवर हल्ला केला. १० दहशतवाद्यांनी सलग चार दिवस गोळीबार आणि बॉम्बस्फोट (26/11 Terror Attack) घडवून आणले. दहशतवाद्यांनी छत्रपती शिवाजी टर्मिनस, ताज हॉटेल, कामा हॉस्पिटल, लिओपोल्ड कॅफे आदी ठिकाणी घुसखोरी करत हल्ले केले. या हल्ल्यात भारतीय पोलीस आणि हल्लेखोरांमध्ये चकमक झाली. यामध्ये ९ हल्लेखोरांसह १७५ लोक मारले गेले तर ३०० हून अधिक जण जखमी झाले.

या घटनेचे पडसाद प्रत्येक भारतीय आणि परदेशी व्यक्तीच्या मनावर उमटले. यानंतर अनेक संवेदनशील दिग्दर्शकांनी या घटनेवर आपआपल्या दृष्टीकोनातून या चित्रपटाची निर्मिती केली. या चित्रपट आणि मालिकांमधून 26/11 च्या घटनेचा प्रसंग सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न काही दिग्दर्शकांनी केला. चला तर पाहुया असे कोणते चित्रपट आहेत, जे या हल्ल्यातील (26/11 Terror Attack) दहशतवादी मनोवृत्ती, शहिद भारतीय नागरिक, पोलिसांचा लढा आणि योगदानाची आपल्याला आठवण करून देतात.

26/11 Terror Attack : या घटनेवर आधारित हे आहेत चित्रपट

मेजर (२०२२)

'मेजर' हा चित्रपट २६/११ हल्ल्यातील शहीद मेजर संदीप उन्नीकृष्णन यांच्यावर आधारीत आहे. मुंबईतील ताज पॅलेस हॉटेलवर झालेल्या हल्ल्यात शहीद झालेले संदीप उन्नीकृष्णन हे राष्ट्रीय सुरक्षा रक्षक (NSG) चे पहिले कमांडो होते. दिग्दर्शक शशीकिरण टिक्का दिग्दर्शित मेजर या चित्रपटात अभिनेता अदिव शेष यांनी संदीप उन्नीकृष्णन यांची भूमिका केली आहे. हा चित्रपट ११ फेब्रुवारी २०२२ मध्ये प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात अदिवी शेषसोबत प्रकाश राज, सई मांजरेकर, रेवती आणि शोभिता मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटाची निर्मिती महेश बाबूच्या जीएमबी एंटरटेन्मेंट आणि सोनी पिक्चर्स यांनी केली आहे. हा चित्रपट हिंदी, तेलुगू आणि मल्याळम भाषेत प्रदर्शित झाला आहे.

हॉटेल मुंबई (२०१८)

२६/११ ला जो हल्ला झाला यावेळी अनेक भारतीय आणि विदेशी पर्यटक ताज हॉटेलमध्ये राहात होते. या दिवशी ताज हॉटेलमध्ये झालेल्यामुळे हल्ल्यात कित्येकांना आपला जीव गमवावा लागला. त्यावेळी ताज हॉटेलमध्ये झालेला हल्ला आणि त्यावेळी ताजमध्ये असणाऱ्या परदेशी पाहूण्यांची अवस्था हे सर्व हॉटेल मुंबई या चित्रपटामध्ये दाखवण्यात आले आहे. ताज हॉटेलच्या स्टाफने तसेच शेफ आणि इतर कर्मचाऱ्यांनी लोकांची कशी मदत केली हे देखील या चित्रपटामध्ये दखवण्यात आले आहे. या चित्रपटात अनुपम खेर, देव पटेल आणि आर्मी हेमर यांनी प्रमुख भूमिका साकारली आहे.

फँटम (२०१५)

कबीर खान दिग्दर्शित 'फँटम' हा चित्रपट २६/११ हल्ल्यावर आधारित आहे. या चित्रपटात अभिनेता सैफ अली खान आणि अभिनेत्री कतरिना कैफ प्रमुख भूमिकेत आहेत. हा चित्रपट एजन्सीच्या जवानांना दहशतवादी मोहिमेवर जाताना अनेक संकटांचा सामना करावा लागतो. दहशतवाद मोहिमेवरील जवानांच्या सघर्षाची ही कथा आहे.

द अटॅक ऑफ 26/11 (२०१३)

मुंबईवरील हल्ल्यातील जिवंत सापडलेला एकमेव दहशतवादी अजमल कसाब हा होता. त्याची पोलीस अधिकाऱ्यांनी कसून चौकशी केली, ही संपूर्ण घटना कशी घडली यावर 'द अटॅक ऑफ 26/11' हा चित्रपट आधारलेला आहे. 1 मार्च 2013 रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटात प्रसिद्ध अभिनेता नाना पाटेकर यांनी प्रमुख भूमिका साकारली आहे. या चित्रपटातील कलाकारांच्या अभिनयाला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली होती.

मुंबई डायरीस् 26/11

मुंबई डायरीस् 26/11

निखिल अडवाणी आणि निखिल गोन्साल्विस यांनी 'मुंबई डायरीस् 26/11' या मालिकेची निर्मिती केली आहे. ही घटना अधोरेखित करणारी ही सर्वात वेदनादायी मालिकेपैकी एक आहे. या मालिकेत हल्ल्यानंतरची मुंबईतील सरकारी रुग्णालयातील भयंकर प्रसंग दाखवाला आहे. 26/11 च्या हल्ल्यानंतर जखमींना रूग्णालयात दाखल केल्यानंतर, येथील संकटांना वैद्यकीय समुदाय कसा हाताळतो हे यातून दाखवले आहे. तसेच या मालिकेत शहराने पाहिलेल्या सर्वात भयानक दहशतवादी हल्ल्याच्या रात्रीचे प्रदर्शन केले आहे.

हेही वाचा:

SCROLL FOR NEXT