Latest

2002 Godhra riots case : गोध्रा हत्याकांडातील ८ दोषींची जामीनावर सुटका ; चार आरोपींना जामीन देण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार

मोनिका क्षीरसागर

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा: अवघ्या देशाला हादरून सोडणाऱ्या गुजरात मधील गोधरा येथे २००२ मध्ये साबरमती एक्सप्रेसला आग लावणाऱ्या ८ दोषींची सुप्रीम कोर्टाने  जामीनावर सुटका  केली आहे. दोषी सध्या आजन्म जन्मठेपेची शिक्षा भोगत आहेत. आतापर्यत सर्व दोषींनी १७ ते २० वर्षांपर्यंत शिक्षा भोगली आहे. तर, कोर्टाने चार दोषींना तुर्त जामीन देण्यास नकार दिला आहे.

या दोषींना कनिष्ठ न्यायालयाने फाशीची शिक्षा ठोवल्यानंतर उच्च न्यायालयाने त्यांची शिक्षा जन्मठेपेत बदलली होती. सरन्यायाधीश डी.वाय.चंद्रचूड आणि न्या.पी.एस.नरसिम्हा यांच्या खंडपीठाने हा निर्णय सुनावला. जामिनाच्या अटी पुर्ण करीत दोषींची जामिनावर मुक्तता करण्यात यावी, असे आदेश न्यायालयाने दिले.

ईदच्या पार्श्वभूमीवर जामिनावर मुक्तता करण्याची अपील दोषींकडून त्यांचे वकील संजय हेगडे यांनी केली होती. न्यायालयाने गोधरात साबरमती एक्सप्रेस ट्रेनमध्ये आग लावत ५९ लोकांना जिवंत जाळण्याप्रकरणात आजन्म जन्मठेपेत असलेले अब्दुल रहमान धंतिया, अब्दुल सत्त्तार, इब्राहिम गद्दी सह एकूण २७ दोषींच्या वतीने दाखल करण्यात आलेल्या जामीन याचिकेवर सुनावणी घेत जामिनासंदर्भात आदेश दिले.

हेही वाचा:

SCROLL FOR NEXT