Latest

स्वतःच्या मुलीवर बलात्कार करणाऱ्या व्यक्तीची २० वर्षांची शिक्षा कायम : सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

backup backup
नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : स्वतःच्या मुलीवर बलात्कार करणाऱ्या इसमाची 20 वर्षांची शिक्षा सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी झालेल्या सुनावणीवेळी कायम ठेवली. गुन्हेगाराला कोणतीही सूट देता येणार नाही, त्याला ही शिक्षा पूर्ण करावीच लागेल, असेही न्यायालयाने बजावले आहे.
प्रत्येक नात्यामधील पावित्र्य जपणे अत्यंत आवश्यक असते. पण या प्रकरणात वडिलानेच असे कृत्य केले की ज्यामुळे मुलीचे आयुष्य बरबाद झाले. अशा व्यक्तीवर दया दाखविण्याचे काही कारण नाही. गुन्हेगाराला आता सोडले तर तो पुन्हा मुलीला इजा करू शकतो,अशी टिप्पणी न्यायमूर्तीं अभय ओक आणि न्यायमूर्ती संजय कुमार यांनी खंडपीठाने केली. संबंधित इसमावरील गुन्हा 2013 साली जलदगती न्यायालयात सिद्ध झाला होता. किमान 20 वर्षांच्या जन्मठेपेची शिक्षा त्याला न्यायालयाने सुनावली होती. यावर इसमाने दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली. तथापि उच्च न्यायालयाने देखील त्याला दिलासा देण्यास नकार दिला. शेवटी संबंधिताने कायद्याच्या विशेष तरतुदीचा आधार घेत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. यावर बुधवारी सुनावणी होऊन न्यायालयाने दोषीची याचिका फेटाळून लावली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT