Latest

Delhi : लॉरेन्स बिश्नोई टोळीचे २ शूटर्स पोलिसांच्या ताब्यात

मोहन कारंडे

पुढारी ऑनलाईन डेस्क : राजधानी दिल्लीतील वसंत कुंजजवळ दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलची लॉरेन्स बिश्नोई टोळीच्या (Lawrence Bishnoi) शूटर्ससोबत चकमक झाली. यादरम्यान दोन्ही बाजूंनी जोरदार गोळीबार झाला. या चकमकीत लॉरेन्स टोळीचे दोन शूटर्संना पकडले गेले असून त्यापैकी एक अल्पवयीन आहे. या शूटर्सवर अनेक गुन्हे दाखल आहेत.

शुक्रवारीही दोघांना अटक

दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेने शुक्रवारीच गोल्डी ब्रार आणि लॉरेन्स बिश्नोई टोळीच्या दोन शूटर्संना अटक केली होती. ३ डिसेंबर २०२३ रोजी पंजाबच्या माजी आमदाराच्या घरावर झालेल्या गोळीबाराच्या घटनेतील ते शूटर आहेत. आकाश आणि अखिल अशी त्यांची नावे असून ते हरियाणातील सोनीपत आणि चरखी दादरी येथील रहिवासी आहेत.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT