Latest

कोल्हापूर : कळंबा जेलमध्ये २ मोबाईल सापडले; जुना राजवाडा पोलिसांत फिर्याद दाखल

दिनेश चोरगे

कोल्हापूर : कळंबा मध्यवर्ती कारागृहाची बुधवारी झाडाझडती घेत असताना दोन मोबाईल हँडसेट आढळले. याप्रकरणी प्रमोद मारुती सरगर (वय 40, कारागृह शिपाई) यांनी जुना राजवाडा पोलिसांत फिर्याद दिली आहे.

मंगळवारी रात्री पावणेअकरा आणि साडेअकराच्या सुमारास प्रवीण सरगर हे सहकार्‍यासमवेत कारागृहाची झाडाझडती घेत असताना सर्कल क्रमांक 5 मधील बराक क्रमांक 4 च्या पाठीमागील परिसरात आणि सर्कल व बराक क्रमांक 3 च्या शौचालयाच्या खिडकीमध्ये हे मोबाईल हँडसेट मिळाले. हे दोन्ही मोबाईल दुधाच्या रिकाम्या पिशवीमध्ये गुंडाळून बॅटरी चिकटटेपने चिटकवलेल्या स्थितीत आढळले. या कर्मचार्‍यांनी ही बाब वरिष्ठांना सांगितल्यानंतर जुना राजवाडा पोलिसांत फिर्याद दाखल करण्यात आली.

SCROLL FOR NEXT