Latest

पिंपरी : महापालिका निवडणूक स्टेशनरीचा खर्च 18 लाख

अमृता चौगुले

पिंपरी, पुढारी वृत्तसेवा: पिंपरी-चिंचवड महापालिकेची निवडणूक केव्हाही लागू शकते. त्यासाठी महापालिका प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. निवडणूक संदर्भातील कामकाजासाठी आवश्यक स्टेशनरीवर 17 लाख 73 हजार खर्च करण्यात येणार आहे. त्यास आयुक्त तथा प्रशासक राजेश पाटील यांनी मान्यता दिली आहे.

पालिका निवडणूक त्रिसदस्यीय प्रभागनिहाय होणार आहे. त्याचे प्रभागनिहाय मतदार यादीचे काम अंतिम टप्प्यात आहे. त्यानंतर निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, पावसामुळे तसेच, ओबीसी आरक्षणासाठी निवडणूक लांबण्याची शक्यता वर्तविली जात आहे. मात्र, महापालिकेकडून निवडणुकीसाठी सर्व प्रकाराची तयारी करण्यात येत आहे.

निवडणुकीसाठी लागणारे मंडप व्यवस्था, सीसीटीव्ही कॅमेरे, शूटींग, झेराक्स आदी कामाच्या खर्चास या आधीच मंजुरी देण्यात आली आहे. निवडणुकीसाठी लागणारी विविध 59 प्रकारच्या स्टेशनरीसाठी 22 लाख 54 हजारांची निविदा काढण्यात आली होती. त्यासाठी निगडीतील शिवसमर्थ एंटरप्रायजेसची 21.35 टक्के कमी दराची 17 लाख 72 हजार 877 रूपयांची निविदा पात्र ठरली आहे. स्टेशनरीचे साहित्य आवश्यकतेप्रमाणे खरेदी करण्यात येणार आहे.

SCROLL FOR NEXT