Latest

इस्रायल लष्कराकडून गाझामधील १७०७ ठिकाणे लक्ष्य

नंदू लटके

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : इस्रायल आणि हमास युद्धाचा आज (दि.१०) चौथा दिवस आहे. दहशतवादी संघटना हमासने शनिवार, ७ ऑक्‍टोबर रोजी गाझा येथून इस्रायलवर हल्ला केला. इस्रायलमधील १५० हून अधिक लोकांना ओलीस ठेवले होते. इस्रायलच्‍या सैन्‍याने ( Israeli army ) गाझावरील प्रत्युत्तरादाखल आतापर्यंत सुमारे १,७०७ ठिकाणांना लक्ष्य केले आहे. इस्रायल सैन्‍याने अनेक मशिदींवर हल्लेही केले आहेत.

इस्रायलने आपल्या सैन्याला संपूर्ण गाझा पट्टी ताब्यात घेण्याचे आदेश दिले आहेत. न्यूयॉर्क टाइम्सच्या वृत्तानुसार, इस्रायलने गाझामधील अनेक मशिदींवरही हल्ले केले आहेत. यापैकी चार मशिदी शाती शरणार्थी शिबिरात होत्या, आधीच गाझा पट्टीतील सर्वात दाट लोकवस्ती असलेल्या भागांपैकी एक गाझामधील निवासी भागात हमासचे तळ असल्याचे इस्रायली लष्कराने म्हटले आहे.

इस्रायल आणि गाझा सीमेवर शनिवारी पहाटे नेमकं काय घडलं?

हमास आणि इस्‍लामिक जिहाद या दहशतवादी संघटनांनी शनिवारी सकाळी गाझा पट्‍टीतून इस्‍त्रायलवर हजारो रॉकेट डागले. यानंतर दहशतवाद्यांनी अत्‍यंत भक्‍कम सुरक्षाकडे भेदत गाझा सीमेजवळील ज्यू वस्‍तीत घुसखोरी केली. नागरिक आणि सैनिकांवर अंदाधूंद गोळीबार केला. नागरिकांना ओलीस ठेवले. या घटनेचा व्‍हिडीओ सोशल मीडियावर व्‍हायरल होत आहेत. काही दहशतवाद्‍यांनी समुद्रमार्गे इस्रायलमध्ये प्रवेश करण्याचाही प्रयत्न केला. गेल्‍या पाच दशकात प्रथमच इस्‍त्रालयवर एवढा मोठा आणि अभूतपूर्व हल्‍ला झाला आहे. या हल्‍ल्‍यानंतर इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी हमास विरुद्ध युद्ध सुरु झाल्‍याचे जाहीर केले. तसेच पॅलेस्टिनींना याची मोठी किंमत मोजावी लागेल, असा इशाराही दिला.

आतापर्यंतचा सर्वात भयंकर हल्‍ला

शनिवारी ज्यू सुट्टीचा उत्सव साजरा करणारी गाझा-इस्त्रायल सीमेजवळसंगीत महोत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्‍यात आले होते. एकीकडे दहशतवाद्‍यांनी रॉकेट हल्‍ला केला तर दुसरीरकडे संगीत महोत्सवात भाग घेतलेलल्‍यांवर दहशतवाद्‍यांनी अंदाधूंद गोळीबार केला. हमासच्या दहशतवाद्‍यांनी इस्त्राईलमध्ये आतापर्यंत केलेल्या हा सर्वात भयंकर हल्‍ला मानला जात आहे. इस्त्रायली बचाव सेवा झकाच्या म्हणण्यानुसार, उत्सवाच्या ठिकाणी किमान २६० मृतदेह सापडतील. शनिवारी रात्री उशिरापर्यंत, इस्रायल संरक्षल दलाने (आयडीएफ) व्‍यक्‍त केलेल्‍या अंदाजानुसार, इस्रायलमध्ये अजूनही घुसखोरी केलेले २०० ते ३०० दहशतवादी आहेत.

इस्रायलने दिले सडेतोड प्रत्‍युत्तर…

हमासने केलेल्‍या हल्‍ल्‍यानंतर इस्रायलनेही सडेतोड प्रत्‍युत्तर देत गाझा पट्टीवर हवाई हल्ले सुरू केले. पंतप्रधान नेतन्याहू यांनी पॅलेस्टिनी नागरिकांनी गाझा पट्टीतून निघून जावे, असा इशारा दिला. हमासने आश्रय घेतलेल्‍या ठिकाणे बेचिराख केली जातील, असेही स्‍पष्‍ट केले. यानंतर इस्‍त्रायलच्‍या लढाऊ विमानांनी गाझा शहराच्या मध्यभागी असलेल्या अनेक इमारतींना लक्ष्य केले. गाझाला होणारा वीज आणि इंधन पुरवठा खंडित केला आहे, ज्याचा परिणाम लवकरच पट्टीच्या वैद्यकीय सुविधांवर होऊ शकतो.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT