Latest

देशातील १५१ पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांना पदक जाहीर; महाराष्ट्रातील ११ जणांचा समावेश

अमृता चौगुले

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : केंद्रीय गृहमंत्रालयाकडून वर्ष-२०२२ साठीचे "केंद्रीय गृहमंत्री पदक (उत्कृष्टता तपास)" नुकतेच जाहीर कण्यात आले. देशभरातील एकूण १५१ पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांना यंदा सन्मानित करण्यात येणार आहे. तपासात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या महाराष्ट्रातील ११ पोलीस अधिकारी आणि कर्मचा-यांना हे पदक जाहीर झाले आहे. गुन्ह्याच्या तपासातील उच्च व्यावसायिक मानकांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि तपासातील अशा उत्कृष्टतेला मान्यता देण्याच्या उद्देशाने २०१८ पासून या पुरस्काराची सुरूवात करण्यात आली आहे.

कृष्णकांत उपाध्याय (उप पोलीस आयुक्त) , प्रमोद भास्करराव तोरडमल (पोलीस निरीक्षक), मनोज मोहन पवार (सहाय्यक पोलीस निरीक्षक), दिलीप शिशुपाल पवार (पोलीस निरीक्षक), अशोक तानाजी विरकर ( उप विभागीय पोलीस अधिकारी), अजित भागवत पाटील (उप विभागीय पोलीस अधिकारी), राणी तुकाराम काळे ( सहाय्यक पोलीस निरीक्षक), दिपशिखा दिपक वारे (पोलीस निरीक्षक), सुरेशकुमार नानासाहेब राऊत (पोलीस निरीक्षक), जितेंद्र बोडप्पा वनकोटी (पोलीस निरीक्षक), समीर सुरेश अहिरराव (पोलीस निरीक्षक) यांना पदक जाहीर करण्यात आले आहेत.

केंद्रीय अन्वेषण ब्यूरोचे ( CBI ) १५, मध्य प्रदेशमधून १० पोलीस अधिकारी-कर्मचारी, उत्तर प्रदेशातून १० पोलीस अधिकारी-कर्मचारी, केरळमधून पोलीस ८, राजस्थानमधून ८ पोलीस , पश्चिम बंगालमधून ८ आणि उर्वरित राज्यांमधून तसेच केंद्रशासीत प्रदेशातील पोलीस कर्मचारी, अधिकाऱ्यांना पदक जाहीर करण्यात आले आहेत. विशेषबाब यामध्ये २८ महिला पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश आहे.

हेही वाचा : 

SCROLL FOR NEXT