Latest

HIV : १४ बालकांना रक्तातून ‘एचआयव्ही’ची बाधा!

दिनेश चोरगे

लखनौ; वृत्तसंस्था :  कानपूर येथील सरकारी रुग्णालयामध्ये रक्त बदलताना 14 मुलांना एचआयव्हीसह हिपॅटायटिस- बी, हिपॅटायटिस-सी यासारख्या विषाणूंचा संसर्ग झाल्याचे वृत्त एका इंग्रजी वृत्तवाहिनीने दिले आहे. रुग्णालयातील अधिकृत सूत्रांनी मात्र हे वृत्त फेटाळले आहे. रुग्णालयाबाबत अफवा पसरविणार्‍यांविरोधात चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.

उत्तर प्रदेशातील विविध भागांतील थॅलेेसेमिया आजाराने त्रस्त असलेल्या 14 मुलांचे रक्त बदलताना त्यांना एचआयव्हीसह हिपॅटायटिसचा संसर्ग झाला आहे. कानपूरमधील लाला लजपतराय या सरकारी रुग्णालयात संबंधित मुलांचे रक्त बदलताना हा गंभीर प्रकार घडला आहे. बालरोग विभागाचे प्रमुख डॉ. अरुणकुमार आर्या यांचा हवालाही यामध्ये देण्यात आला आहे. अरुणकुमार यांनी एचआयव्हीसारख्या विषाणूचा मुलांना रक्ताद्वारे संसर्ग होणे गंभीर आणि चिंताजनक असल्याची प्रतिक्रिया दिली आहे.

SCROLL FOR NEXT