सिंधुदूर्ग/गगनबावडा : पुढारी वृत्तसेवा
करूळ घाटात ट्रक आणि मिनीबस यांच्यामध्ये झालेल्या अपघातात मिनी बस मधून प्रवास करणाऱ्या १३ महिला किरकोळ जखमी झाल्या आहेत. सुदैवाने यामध्ये कोणतीही जिवीतहानी झालेली नाही. हा अपघात शुक्रवारी पहाटे ४ वा. च्या सुमारास झाला. त्यामुळे घाटात दोन्ही बाजूने वाहनांच्या लांब रांगा लागल्या होत्या. सकाळी १० वाजेपर्यंत वाहतूक ठप्प झाली होती. त्यानंतर पोलीसांनी अपघातग्रस्त वाहने बाजूला करुन वाहतूक सुरळीत केली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पुणे येथून सिंधुदुर्ग जिल्ह्यात पर्यटनासाठी मिनी बसमधून १६ महिला पर्यटक येत होत्या. ही बस करुळ घाटात आली असता, मागून येणारा ट्रक मिनी बसला ओव्हर टेक करत असताना अचानक ट्रकचा टायर फुटला आणि ट्रक खड्डयामुळे मिनी बसवर आदळला. या अपघातात मिनी बसमधून प्रवास करणाऱ्या १३ महिला पर्यटक किरकोळ जखमी झाल्या आहेत.
अपघाताची माहिती समजताच वैभववाडी पोलीस निरीक्षक अतुल जाधव आपल्या कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी जखमींना वैभववाडी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.
हेही वाचा