Latest

राज्यात 126 जण हृदयाच्या प्रतीक्षेत

backup backup

कोल्हापूर : एकनाथ नाईक हृदयाच्या काही अशा समस्या, असे आजार ज्यामध्ये दुसरे हृदय बसवण्याची म्हणजेच हृदय प्रत्यारोपण करण्याची गरज असते, अशावेळी ब्रेनडेड रुग्णाच्या शरीरातील हृदय दिले जाते; पण वेळीच हे हृदय न मिळाल्याने कित्येकांचा मृत्यू होतो. महाराष्ट्रात 126 जण हृदय प्रत्यारोपणाच्या प्रतीक्षेत आहेत. त्यांना दाते मिळाले नसल्याने ते मृत्यूशी झुंज देत आहेत.

अपघातात किंवा अन्य आजारांनी एखाद्या व्यक्‍तीचा उपचारादरम्यान ब्रेनडेड  (मेंदू मृत) झाला की, त्यांच्यावरील पुढील उपचार थांबतात. अशा वेळी वैद्यकीय तज्ज्ञांचे पथक संबंधिताला ब्रेनडेड  घोषित करते. अजूनही अवयवदान किंवाब्रेनडेड  झाल्यानंतर पुढे काय करायचे या विषयी जनजागृती झालेली नाही. त्यामुळे नातेवाईक रुग्णाला घेऊन घरी सेवा करतो असे सांगतात; पण मेंदूचे कार्य थांबल्याने शरीराचे अन्य कार्य चालू असते. रुग्ण बेशुद्ध अवस्थेत असतो.

त्यामुळे रुग्णाची त्वचेसह अन्य अवयवांना इजा पोहोचते. ब्रेनडेड  झाल्यानंतर पुढे काय, याविषयी शासकीय रुग्णालये, सामाजिक संघटना, तरुणांनी पुढे येऊन जानजागृती करणे गरजेचे आहे. अवयवदानाअंतर्गत 'लाईव्ह ऑर्गन डोनेशन'द्वारे किडनी, लिव्हर प्रत्यारोपण करण्यात येते. कॅडव्हेर मस्तिष्कस्तंभ मृत्यूपश्‍चात किडनी, लिव्हर, लंग्ज, हृदय, त्वचा हे अवयव दान करता येतात. अवयव प्रत्यारोपणाची प्रतीक्षा लक्षात घेऊन राज्य शासनाने समाजात जागृती व्हावी म्हणून 'महाअवयवदान ' जनागृती अभियान 2016 मध्ये राबविले. या चळवळीची जबाबदारी राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांवर सोपविण्यात आली होती; पण सध्या ही चळवळ शासकीय पातळीवर कोलमडली आहे.

जिल्ह्यात महिलेने केले पहिले अवयवदान

जिल्ह्यातील सरूड (ता. शाहूवाडी ) येथील कमल कांबळे यांनी प्रथम किडनी दान करून जिल्ह्याला आदर्श घालून दिला. यानंतर 6 मे 2018 रोजी निगवे खालसा (ता. करवीर ) येथील अमर पाटील या शेतकर्‍याच्या मुलाने हृदय, लिव्हर, किडनी, 15 जुलै 2018 रोजी ताराबाई पार्क येथील गुंजन बासराणी या युवकाने लिव्हर, कसबेकर पार्क येथील धनंजय जामदार यांनी दोन किडन्या व लिव्हर दान केले. 22 सप्टेंबर 2018 रोजी बेले (ता. करवीर ) येथील सुनील बेलेकर यांनी यकृत, किडन्या दान केल्या. 8 नोव्हेंबर 2019 रोजी शिवाजी पार्क येथील मिनल शहा यांचा ब्नेनडेड झाल्यामुळे नातेवाईकांनी डोळे, दोन किडन्या, यकृत, फुफ्फुस दान करण्याचा धाडसी निर्णय घेतला. या कुटुंबीयांचा आदर्श घेऊन जिल्ह्यातील अन्य रुग्णांचे नातेवाईक ब्रेनडेडनंतर अवयवदान करण्यासाठी पुढे आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT