Latest

‘रॉकस्टार’ची १२ वर्ष, नर्गिस फाखरी म्हणते – म्हणून खास आहे Rockstar

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : इम्तियाज अली दिग्दर्शित आणि रणबीर कपूर आणि नर्गिस फाखरी अभिनीत "रॉकस्टार" या अनोख्या चित्रपटाला आज तब्बल १२ वर्ष झाली आहेत. (Nargis Fakhri) सर्वोत्कृष्ट संगीत आणि उत्तम कथा असलेला चित्रपट आजही प्रेक्षकांच्या मनात तितकाच खास आहे. (Nargis Fakhri)

संबंधित बातम्या –

या चित्रपटात हीरची भूमिका साकारणाऱ्या नर्गिस फाखरी हिने रॉकस्टार चित्रपटाच्या १२ वर्षाबद्दल बोलताना म्हटले की, "रॉकस्टारचा १२ वर्षांचा प्रवास नक्कीच कमालीचा आहे.त्यावेळी हिंदी फारसे माहित नसतानाही हा चित्रपट करण हे एक आव्हान होतं.

हीरची भूमिका साकारण्याचा अनुभव अगदीच सुंदर होता. सखोल अनुभव आणि सोबतीने एक आव्हान असलेला चित्रपट रॉकस्टार होता. मला अशी खास व्यक्तिरेखा मिळाल्या बद्दल मी इम्तियाज अलीचे खूप आभारी आहे "

आगामी काळात नर्गिस फाखरीकडे अनेक प्रोजेक्ट्स आहेत. चाहते तिच्या आगामी वेब सीरिज "ततलुबाज" ची आतुरतेने वाट बघता आहेत.

SCROLL FOR NEXT