Latest

भंगाराच्या व्यावसायीकाकडे सापडल्या 1105 बंदुकीच्या गोळ्या

अमृता चौगुले

पुणे, पुढारी वृत्तसेवा: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौर्‍याच्या अनुषंगाने शहरात घेण्यात आलेल्या कोंबींग ऑपरेशनच्या माध्यमातून गुन्हे शाखेच्या युनिट 1 पर्वती येथील जनतावसाहत मधील एका भंगाराच्या व्यावसायीकाडून मोठ्या प्रमाणावर बंदुकीच्या गोळ्या जप्त केल्या. यावेळी त्याच्याकडून 1 हजार 105 गोळ्या जप्त करण्यात आल्या असून त्यामध्ये 56 नग जिवंत काडतुसे, 79 खराब काडतुसे, 970 बुलेट अशा 1 लाख 57 हजारांच्या गोळ्या जप्त करण्यात आल्या आहेत.

दिनेशकुमार कल्लुसिंग सरोज (34, रा. पर्वती दर्शन, जनता वसाहत,मुळ रा. मंगलपुर ता. कुडा जि. प्रतापगड, उत्तरप्रदेश) असे अटक करण्यात आलेल्या व्यावसायीकाचे नाव आहे. त्याला न्यायालयात हजर करण्यात आले असता त्याला 15 जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनाविन्यात आली आहे. युनिट 1 चे कर्मचारी पेट्रोलिंग करत असताना गुरूवार पेठेतील गौरी आळी येथे भंगाराचा व्यावसाय करणारा याच्याकडे बंदुकीची काडतुसे ठेवली आहे अशी माहिती मिळाली.

या माहितीच्या आधारे संबंधीत ठिकाणी छापा टाकून युनिट 1 ने 1 हजार 105 गोळ्या जप्त करण्यात आल्या असून त्यामध्ये 56 नग जिवंत काडतुसे, 79 खराब काडतुसे, 970 बुलेट अशा 1 लाख 57 हजारांच्या गोळ्या जप्त केल्या. पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता, अपर पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त श्रीनिवास घाडगे, सहायक पोलिस आयुक्त गजानन टोम्पे यांच्या सुचनेनुसार युनिट 1 चे वरिष्ठ निरीक्षक संदीप भोसले, उपनिरीक्षक संजय गायकवाड, सुनिल कुलकर्णी, अजय जाधव यांच्या पथकाने ही कारवाई केली.

एवढ्या मोठ्या प्रमाणात दिनेशकुमारने काडतुसे कोठून आणली ? ती काडतुसे जवळ कशासाठी बाळगली, त्यातील काडतुसे त्याने कोणाला दिली का त्याचा ही काडतुसे जवळ बाळगण्या मागचा नेमका काय उद्देश होता याचा तपास सुरू आहे.

                               -संदीप भोसले, वरिष्ठ निरीक्षक, गुन्हे शाखा, युनिट 1.

हेही वाचा 

SCROLL FOR NEXT