Latest

महाराष्‍ट्र भूषण प्रदान सोहळ्यास उपस्‍थितापैकी ११ जणांचा उपचारादरम्‍यान मृत्‍यू

निलेश पोतदार

पनवेल ; पुढारी वृत्‍तसेवा खारघर येथे झालेल्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यासाठी उपस्थित असलेल्‍या काही श्री सदस्यांना उष्माघातामुळे रुग्णालयात हलवावे लागले. यामध्ये अकरा जणांचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला. राज्य शासनातर्फे मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत देण्यात येणार असून रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या श्री सदस्यांचा उपचाराचा खर्च शासनामार्फत केला जाईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे.

एकूण ११ मृतदेह उपजिल्हा रुग्णालय पनवेल येथे आणले आहेत. त्यापैकी एका मृतदेहाची (महिला) ओळख पटलेली नाही. विरार, जव्हार, सोलापूर आणि मंगळवेढा येथील मृतदेह त्यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात दिले आहेत. अजुन ३ व्यक्ती बेपत्ता असून, त्यांचा शोध लागलेला नाही. दरम्‍यान ३८ लोक अजूनही रुग्णालयात दाखल असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

एकूण 38 जणांना दाखल केले होते. त्यापैकी त्‍यापैकी 11 मृत झाले असून, 8 जणांना डिसचार्ज देण्यात आला आहे.

● नवी मुबईत उपचारासाठी रुग्णालयाची नावे
एमजीएम रुग्णालय 01
भारती मेडिकल रुग्णालय 02
टाटा रुग्णालय 08

● मृत सदस्य नावे
01. तुळशीराम भाऊ वागडे (वय 58)
जांभूळ विहीर ता जव्हार

02. जयश्री जगन्नाथ पाटील (54)
रा वारळ पो मोदडी ता म्हसळा

03. महेश नारायण गायकर वय (42)
रा मेदडू ता म्हसळा

04.मंजुषा कृष्णा भोगडे
रा भुलेश्वर मुंबई
मुलागाव
श्रीवर्धन

05. भीमा कृष्णा साळवे (वय 58)
रा कळवा ठाणे

06. सविता संजय पवार (42)
रा मंगळवेदा सोलापूर

07. स्वप्नील सदाशिव किणी (वय 32) रा विरार

08. पुष्पां मदन गायकर वय 63 कळवा ठाणे

09. वंदना जगन्नाथ पाटील
(वय 62)

रा माडप ता खालापूर

10. कलावती सिद्धराम वायचल
रा सोलापूर

11 अनोळखी आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT