धाराशिव, पुढारी वृत्तसेवा : शहरातील दहावीच्या एका परीक्षा केंद्रावर सोमवारी (दि. ६) मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाची प्रश्नपत्रिका वाटप करण्यात आली. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये गोंधळाचे वातावरण होते. दरम्यान, हा प्रकार घडला असून या विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ देणार नसल्याचे शिक्षणाधिकारी गजानन सुसर यांनी सांगितले.
शहरातील शरद पवार हायस्कूल या शाळेत दहावीचे परीक्षा केंद्र आहे. या केंद्रावरील एका खोलीत २५ विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी अस लेली फर्स्ट लँग्वेजची अर्थात प्रश्नपत्रिका वाटप करण्यात आली. प्रश्नपत्रिका पाहून विद्यार्थ्यांमध्ये गोंधळ उडाला. त्यांनी पर्यवेक्षकांना ही बाब लक्षात आणून दिल्यानंतरही उपयोग झाला नाही. दरम्यान, या केंद्रावरील एका वर्गामध्ये मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी असलेला इंग्रजीचा थर्ड लँग्वेजचीच प्रश्नपत्रिका वाटप करण्यात आली होती. केवळ एका वर्गात हा गोंधळ उडाला.
सुसर अखेर विद्यार्थी, पालकांनी परीक्षा संपल्यानंतर केंद्रप्रमुखांना भेटून हा प्रकार • निदर्शनास आणून दिला. त्यानंतर शिक्षणाधिकाऱ्यांच्या कानावर ही बाब गेली. त्यांनी एसएससी बोर्डाच्या वरिष्ठ कार्यालयाशी संपर्क साधून ही माहिती दिली. त्यावर या विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ देणार नाही. विद्यार्थ्यांनी निश्चित राहावे, असा निरोप आला असल्याचे शिक्षणाधिकारी सुसर यांनी सांगितले.