Latest

100 year old youth : शंभरव्या वर्षीही ‘ते’ तंदुरुस्त; दीर्घायुष्याचे ‘हे’ आहे रहस्य..

Arun Patil

वॉशिंग्टन : अमेरिकेच्या पेनसिल्वानियामध्ये राहत असलेले लेस सविनो शंभर वर्षे (100 year old youth) वयाचे आहेत; मात्र या वयातही ते तंदुरुस्त असून व्यायामही करतात. या दीर्घायुष्याचे व आरोग्याचे रहस्य त्यांच्या नियमित व शिस्तबद्ध दिनचर्येत आहे असे ते सांगतात.

अमेरिकन हवाई दलातील निवृत्त पायलट असलेले सविनो म्हणतात की, मी आता शंभर वर्षांचा (100 year old youth) वृद्ध झालो हे माझ्यासाठी फारसे महत्त्वाचे नाही. महत्त्वाचे हे आहे की, या वयातही मी सक्रिय आहे आणि जीवनाचा आनंद घेत आहे. मी सिगारेट पित नाही आणि मी कधीही दारूला स्पर्श केलेला नाही. मी औषधांच्या आधाराने जगत नाही तसेच अंथरुणाला खिळून राहिलेलो नाही. मला अजूनही मी तीस वर्षांचा असल्यासारखेच वाटते. मी गेल्या 40 वर्षांपासून एकसारख्याच दिनचर्येचा अवलंब करीत आहे.

मी सकाळी सात वाजता उठतो आणि रात्री साडे दहा वाजता झोपतो. (100 year old youth) आठवड्यातून पाच दिवस सकाळी तीन तास जीममध्ये घाम गाळतो. यापैकी तीन दिवस वजन उचलतो आणि दोन दिवस कॉर्डियो करतो. पंधरा वेगवेगळ्या वेट मशिन्सवर 45 वेळा वजन उचलतो. याचा अर्थ रोज सुमारे 700 वेळा कॉर्डियोच्या दोन दिवसांमध्ये मी 13 किलोमीटर सायकल चालवतो. ट्रेडमिलवर तीन किलोमीटर चालतो. मी हात-पाय आणि खांद्यांचाही व्यायाम करतो. सध्या केवळ बीपीच्या गोळ्या मी खातो.

आहाराबाबतही मी काळजी घेतो. हिरव्या भाज्या खातो. मांसाहारात सी फूड म्हणजेच मासे, कोळंबी वगैरे खाणे मला आवडते. आठवड्यातून एकदा अंड्यांपासून बनवलेली डिश 'फ्रिटाटा' खातो. मी केवळ स्वादासाठी खात नाही, पोट भरले की मी खाणे थांबवतो. अकरा वर्षांपूर्वी म्हणजे माझ्या वयाच्या 89 व्या वर्षी पत्नीचे निधन झाले; मात्र मी (100 year old youth) स्वतःला एकाकी बनवलेले नाही. मी नवे नवे मित्र बनवतो, पुस्तके वाचतो आणि कोणत्याही प्रकारचा तणाव घेत नाही.

हेही वाचा :  

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT