Latest

Latest News on Power Generation | राज्यात रुफटॉपद्वारे १९०० मेगावॉट वीजनिर्मिती

अंजली राऊत

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
प्रधानमंत्री सूर्यघर (रुफटॉप) याेजनेअंतर्गत राज्यातील घरगुती वीजग्राहकांचा प्रतिसाद दिवसेंदिवस वाढत आहे. राज्यातील एक लाख २७ हजार ६४६ ग्राहकांनी या योजनेत सहभाग नोंदविला आहे. या माध्यमातून एक हजार ९०७ मेगावॉट विजेची निर्मिती होत आहे.

देशभरात 'प्रधानमंत्री-सूर्यघर मोफत वीज योजना' (Pradhan Mantri-Surya Ghar Muft Bijli Yojana) राबविण्यात येत आहे. उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या योजनेची वेगाने अंमलबजावणी करावी, अशा सूचना महावितरणला केल्या आहेत. त्यानुसार राज्यात प्रभावीपणे ही योजना राबविली जात आहे. सूर्यघर योजनेत (रुफटाॅप) सोलर सिस्टिम बसविणाऱ्या ग्राहकांना दोन किलोवॉट क्षमतेपर्यंत प्रत्येक किलोवॉटला ३० हजार रुपये अनुदान मिळेल. तर अधिक एक किलोवॉट म्हणजे तीन किलोवॉट क्षमतेची सिस्टिम बसविणाऱ्या ग्राहकाला एका किलोवॉटला १८ हजार रुपये अधिकची सबसिडी मिळेल. अर्थात एक किलोवॉटसाठी ३० हजार रुपये, दोन किलोवॉटसाठी ६० हजार रुपये व तीन किलोवॉटसाठी ७८ हजार रुपये अनुदान केंद्र सरकारकडून थेट मिळणार आहे. वीज ग्राहकांनी कितीही क्षमतेची सोलर सिस्टिम बसविली तरी जास्तीत-जास्त ७८ हजार रुपये प्रती ग्राहक अनुदान शासनाने निश्चित केले आहे.

केंद्राच्या या योजनेला महाराष्ट्रात आतापर्यंच चांगला प्रतिसाद लाभला आहे. राज्यात २० फेब्रुवारीपर्यंत सव्वा लाखाहून अधिक वीज ग्राहकांनी रुफटॉप सोलर यंत्रणा बसविली आहे. या माध्यमातून एक हजार ९०७ मेगावॉट वीजनिर्मिती होत आहे. या योजनेतून होणाऱ्या वीजनिर्मितीमुळे भविष्यात राज्यातील वीजनिर्मितीची क्षमतेमध्ये वाढ होण्यास मदत होणार आहे.(Pradhan Mantri-Surya Ghar Muft Bijli Yojana)

नवीन दराने अनुदान
केंद्र सरकारने देशातील एक कोटी घरांसाठी ही योजना सुरू केली आहे. एक किलोवॉट क्षमतेच्या रुफटॉप सोलर सिस्टिममधून दररोज सुमारे चार युनिट अर्थात दरमहा सुमारे १२० युनिट वीज तयार होते. महिना दीडशे युनिटपर्यंत वीजवापर करणाऱ्या कुटुंबाला दोन किलोवॉटपर्यंतच्या क्षमतेची रुफटॉप सोलर सिस्टिम पुरेशी आहे. रुफटॉप सोलरसाठी १३ फेब्रुवारीनंतर राष्ट्रीय पोर्टलवर अर्ज दाखल केलेल्या सर्व ग्राहकांना केंद्र सरकार नव्या दराने अनुदान देणार असल्याची माहिती महावितरणकडून देण्यात आली आहे. (Pradhan Mantri-Surya Ghar Muft Bijli Yojana)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT