पुढारी ऑनलाईन डेस्क : उत्तराखंडच्या गौरीकुंडमध्ये दरड कोसळून मोठी दुर्घटना घडली आहे. यामध्ये तिघांचा मृत्यू झाला असून, २० जण बेपत्ता झाले आहेत. उत्तराखंडचे डीजीपी अशोक कुमार यांनी सांगितले की, रुद्रप्रयाग जिल्ह्यातील केदारनाथ धामयात्रेच्या मार्गावर हा अपघात झाला. बचाव पथकामार्फत शोधमोहीम सुरु करण्यात आली आहे. बेपत्ता झालेल्यांपैकी १७ नेपाळचे नागरिक आहेत.
उत्तराखंडमधील टिहरी गढवाल जिल्ह्यात शनिवारी (दि. ६) रात्री पावसामुळे घराची भिंत कोसळल्याची घटना घडली. भिंतीखाली दबून दोन मुलांचा मृत्यू झाला. दुसरीकडे नैनितालमध्ये पुलावरून जाणारी बस उलटली. प्रशासनाला या बसमधील ३५ जणांना वाचवण्यात यश आले.