पुढारी ऑनलाईन डेस्क : ललित पाटील ससून ड्रग्ज प्रकरणी पोलिसांचा कारवाईचा तडाखा सुरूच आहे. ललित पाटीलला पळून जाण्यास मदत केलेल्या दोन मैत्रिणींना कालच पुणे पोलिसांनी थेट नाशिकमध्ये जाऊन अटक केली होती. त्यानंतर आता आणखी एका व्यक्तीला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. सचिन वाघ असं अटक करण्यात आलेल्याच नाव आहे. अटक केलेला हा ललित पाटील याचा कारचालक आहे. बंगळुरूत ललित पाटील याचा मित्र सचिन वाघ हे दोघे सोबत असल्याचा पोलिसांना संशय आहे.
दरम्यान, ललित पाटील ड्रग्ज प्रकरणात आता नवीन नवीन खुलासे उघडकीसयेत आहेत, त्यातच आता मुंबई पोलिसांनी ललित पाटील याचा मित्र असलेला त्याच्या कारचालकाला काल रात्री उशीरा बेड्या ठोकल्या आहेत. सचिन वाघ (वय30) असं या चालकाचं नाव असून याला साकीनाका पोलिसांनी अटक केली आहे. ललित पाटीलने ससून रुग्णालयातून पळून गेल्यानंतर सचिन वाघ याने विविध राज्य आणि जिल्ह्यात जाण्यासाठी मदत केली होती. त्यामुळे सचिन वाघ याला ताब्यात घेऊन त्याची चौकशी करण्यात येणार आहे.
हेही वाचा