Latest

राजा असलास म्हणून काय झालं ? महिलेनं चिडलेला सिंह मांजरासारखा मिठीत धरून नेला ! (video)

backup backup

पुढारी ऑनलाईन डेस्क

सोशल मीडियात सातत्याने व्हायरल होत असलेल्या व्हिडिओवर नेहमीच विश्वास ठेवला जाऊ शकत नाही, पण विशेषत: जर एखादी स्त्री सिंहाला घेऊन रस्त्यावरून चालत जाण्यासारखी गोष्ट अविश्वसनीय असेल तर! तथापि, या प्रकरणात, नेटिझन्सना गोंधळात टाकले असले तरीही, व्हिडिओ खरा असल्याचे दिसून आले आहे.

सोशल मीडियात व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये बुरखा घातलेली एक महिला एका सिंहाला थेट कवळा मारून रस्त्यावर घेऊन जाताना दिसत आहे. यावेळी सिंह खूप चिडलेला दिसून येत आहे. परंतु ती बुरखा घातलेली स्त्री अगदी निश्चयी दिसून येत होती, मांजराला धरून नेल्याप्रमाणे ती सिंहाला नेत असल्याचे स्पष्ट दिसते.

हा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होऊ लागल्यानंतर अनेक युझर्सनी या व्हिडिओच्या सत्यतेबद्दल प्रश्न उपस्थित केले, कारण फुटेज फारसे स्पष्ट दिसत नव्हते आणि महिलेनं ज्या पद्धतीने सिहिंणीला ऊचलून नेले होते त्यावरून जोकचाही महापूर आला होता.

तथापि, हा व्हायरल व्हिडिओ ओरिजनल असल्याचे असल्याचे दिसून आले. हा व्हिडिओ १ जानेवारी २०२२ रोजीचा कुवेतमधील सबाहिया जिल्ह्यातील आहे. कुवैती वृत्तपत्र अल-अन्बाच्या मते, व्हिडिओमधील सिंह महिलेच्या घरातील पाळीव म्हणून आहे आणि व्हायरल क्लिपमध्ये वडीलही दिसून येतात. सिंह त्यांच्या घरातून पळून गेल्यानंतर फुटेज कॅप्चर करण्यात आले आहे. तो रस्त्यावर फिरत असताना रहिवाशी मात्र घाबरून गेले होते.

सिंह रस्त्यावरू दिसू लागल्यानंतर पर्यावरण पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्या महिलेला मदत केली. जी नंतर सिंहाची मालक असल्याचे आढळून आले. तिने त्याला मांजराप्रमाणे पकडून धरून बंदिवासात परत आणल्याचे अल अरेबियाने वृत्त दिले आहे.

सिंहाला आपल्या हातात धरून ठेवणे अत्यंत धोकादायक आहे आणि तो चिडलेला असेल, तर कल्पना न केलेली बरी. तेव्हा अनेकांनी व्हिडिओ पाहून असा अंदाज लावला की हा व्हिडिओ ओरिजनल असू शकत नाही. मात्र, ते दृश्य पाहून लोक आश्चर्यचकित झाले असले तरी, ऑनलाईन भरपूर जोक मात्र व्हायरल झाले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT