कोपार्डे; पुढारी वृत्तसेवा : कुंभी-कासारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीची मतमोजणी आज (दि.१४) सुरू आहे. पहिल्या फेरीत करवीरमधील गावांची गट क्रं.१ ची मतमोजणी पूर्ण झाली असून यामध्ये विरोधी राजर्षी शाहू कुंभी कासारी बचाव पॅनेल ४७६ मतांनी आघाडीवर आहे. पहिल्या टप्प्यात १ ते ३५ मतदान केंद्रावरील मतपेट्या फोडण्यात आल्या. यात मोठ्या गावांत सभासदांनी पॅनलला एकतर्फी मतदान केल्याचे चित्र समोर आले आहे.
कुंभी-कासारी सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी रविवारी अंत्यत चुरशीने ८२.४५ टक्के मतदान झाले. या निवडणुकीसाठी २३ जागांसाठी ५० उमेदवार रिंगणात आहेत. आज रमणमळा, कसबा बावडा कोल्हापूर येथे सकाळी ८.३० वा. मतमोजणी सुरू झाली. ३५ टेबलवर तीन फेऱ्यात मतमोजणी सुरू असून १७५ कर्मचारी कार्यरत आहेत. यामध्ये १ ते ३५ पहिली फेरी, ३६ ते ७० दुसरी व ७१ ते १०५ तिसरी फेरी होणार आहे. पहिल्या ३५ मतपेटीतील मतपत्रिकांच्या २५ प्रमाणे गट्टे करण्यात आले. दुरंगी लढत असल्याने उत्सुकता वाढली आहे. काही टेबलवर दोन ते तीन टक्के फुटीर मतदान केल्याचे दिसते. उर्वरित बहुतांश पॅनल टू पॅनल मतदान दिसून येते. पहिल्या फेरीची मतदान मोजणी पूर्ण होण्यास दुपारी ३ वाजतील असे चित्र आहे.
पहिल्या फेरीत करवीरमधील गावांची गट कं.१ ची मतमोजणी पूर्ण झाली असून यामध्ये विरोधी राजर्षी शाहू कुंभी कासारी बचाव पॅनेल ४७६ मतांनी आघाडीवर आहे.
मतदान पुढीलप्रमाणे :
शिवाजी तोडकर : ३६१४
अनिल पाटील : ३२४६
एकनाथ पाटील. : ३५२४
भगवंत पाटील : ३१४२
युवराज पाटील : ३२९५
बाजीराव शेलार : ३१३८
पहिल्या फेरीतील करवीर मधील गावांची उत्पादक सभासद गट कं.२ ची मतमोजणी पूर्ण झाली असून यामध्ये विरोधी राजर्षी शाहू कुंभी कासारी बचाव पॅनेल ६६० मतांनी आघाडीवर आहे.
मतदान पुढीलप्रमाणे :
बाजीराव खाडे : ३६२४
राहूल खाडे : ३२९७
किशोर पाटील : ३२२८
परशराम पाटील : ३२१९
बुध्दीराज पाटील : ३३९२
सरदार पाटील. : ३३००
दादासो लाड : ३२७६
उत्तम वरूटे : ३२६७
राजेंद्र सुर्यवंशी : ३९५७
सर्जेराव हुजरे : २८३८
पहिल्या फेरीतील करवीर मधील गावांची उत्पादक सभासद गट कं. ३ ची मतमोजणी पूर्ण झाली. यामध्ये विरोधी राजर्षी शाहू कुंभी कासारी बचाव पॅनेल २३५ मतांनी आघाडीवर आहे.
मतदान पुढीलप्रमाणे :
आनंदा पाटील : ३४४६
बाजीराव पाटील : ३४४७
विश्वास पाटील : ३२२०
सर्जेराव पाटील : ३३०२
सरदार पाटील : ३२१२
संजय पाटील : ३२२५