simhastha kumbh mela amrit snan date
जगातील सर्वात मोठा धार्मिक अन् सांस्कृतिक सोहळा म्हणून 'सिंहस्थ कुंभमेळ्या'कडे संपूर्ण भाविकांचे लक्ष वेधले आहे. प्राचीन परंपरेनुसार दर १२ वर्षांनी भरणारा हा कुंभमेळा म्हणजे भारतीय सनातन संस्कृतीचे प्रतीक मानला जातो. यंदाच्या नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याचा औपचारिक शुभारंभ शनिवार, ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी ध्वजारोहणाने होणार आहे. ध्वजारोहणाच्या शुभमुहूर्तापासून आखाड्यांचे धार्मिक विधी, साधू-संतांचे आगमन आणि विविध धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल सुरू होणार आहे. या पार्श्वभूमीवर जाणून घेऊया कुंभमेळ्यातील मुख्य 'अमृत स्नान' आणि महत्त्वाच्या मुहूर्तांविषयी...
सिंहस्थ ध्वजारोहण शुभारंभ: शनिवार, ३१ ऑक्टोबर २०२६ (दुपारी १२ वाजून ०२ मिनिटांनी | स्थळ: रामकुंड, पंचवटी)
प्रथम अमृतस्नान: सोमवार, २ ऑगस्ट २०२७ (आषाढ सोमवती अमावस्या)
महाकुंभस्नान (द्वितीय अमृतस्नान): मंगळवार, ३१ ऑगस्ट २०२७ (श्रावण अमावस्या)
तृतीय अमृतस्नान: शनिवार, ११ सप्टेंबर २०२७ (भाद्रपद शुद्ध एकादशी)
कुंभमेळ्याच्या काळात केवळ मुख्य तीन अमृत स्नानांनाच नव्हे, तर सिंहस्थ पर्वकाळातील सर्व एकादशी, पौर्णिमा, अमावस्या, वैधृती आणि व्यतिपात योग या दिवसांनाही मोठे धार्मिक महत्त्व असते. हे सर्व दिवस भाविकांसाठी तीर्थस्नान आणि दर्शनाचे पर्व असतील.
नाशिक कुंभमेळ्याचे संपूर्णवेळापत्रक डाऊनलोड करा Nashik Kumbh Mela Timetable PDF
यंदा नाशिक येथे मुख्य तीन पर्वण्यांव्यतिरिक्त एकूण ४४ पर्वस्नानाचे मुहूर्त आहेत, तर त्र्यंबकेश्वर येथे एकूण ५३ पर्वस्नानाचे मुहूर्त असणार आहेत. "अमृत स्नानाच्या मुख्य दिवसांवर होणारी अलोट गर्दी विचारात घेता, भाविकांनी इतर पर्वस्नानाच्या मुहूर्तांवरही मोठ्या संख्येने उपस्थित राहून स्नानाचा व दर्शनाचा लाभ घ्यावा," असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
नाशिक कुंभमेळा
सिंहस्थ ध्वजारोहण शुभारंभ- शनिवार ३१ ऑक्टोबर २०२६, दुपारी १२ वाजून २ मिनिटांनी (स्थळ-रामकुंड पंचवटी)
प्रथम अमृतस्नान-सोमवार २ ऑगस्ट २०२७,आषाढ सोमवती अमावस्या.
महाकुंभस्नान/द्वितीय अमृतस्नान-मंगळवार ३१ ऑगस्ट २०२७, श्रावण अमावस्या
तृतीय अमृतस्नान-शनिवार ११ सप्टेंबर २०२७, भाद्रपद शुद्ध एकादशी
त्र्यंबकेश्वर कुंभमेळा
सिंहस्थ ध्वजारोहण शुभारंभ- शनिवार ३१ ऑक्टोबर २०२६,
प्रथम अमृतस्नान-सोमवार २ ऑगस्ट २०२७, आषाढ सोमवती अमावस्या.
महाकुंभस्नान/द्वितीय अमृतस्नान-मंगळवार ३१ ऑगस्ट २०२७, श्रावण अमावस्या
तृतीय अमृतस्नान-शनिवार १२ सप्टेंबर २०२७, भाद्रपद शुद्ध द्वादशी (वामन द्वादशी)