Nashik Kumbh Mela 2027  Pudhari News Network
महाकुंभ

Simhastha kumbh mela nashik 2027| 'महाआरती'मधून विक्रमाला घालणार गवसणी, रामतीर्थ येथे गोदापूजन

जय्यत तयारी : राष्ट्रपतींच्या हस्ते दिले जाणार प्रमाणपत्र

पुढारी वृत्तसेवा

Nashik Simhastha Maha Aarti Guinness Record

नाशिक : रामतीर्थ गोदावरी सेवा समितीकडून शनिवारी (दि. ३१) रामतीर्थ येथे गोदापूजन आणि जनजातीय सिंहस्थ महाआरती केली जाणार आहे. या महाआरतीची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद होण्याची शक्यता आहे. त्यासाठी समितीकडून जय्यत तयारी केली आहे.

साडे सहा हजार महिला एकाचवेळी महाआरती करणार आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते सिंहस्थ महाकुंभ ध्वजारोहण सोहळा पार पडल्यानंतर महाआरतीत सहभागी असलेल्या साडे सहा हजार महिला रामकुंड अन् गोदाघाटाचा ताबा घेणार आहेत. त्यानंतर दुपारी एकला महाआरतीचा 'ड्रायरन' घेतला जाणार आहे. नंतर दुपारी ४ ला प्रत्यक्ष महाआरती करून त्याची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद केली जाणार आहे. त्यानंतर पुन्हा राष्ट्रपतींच्या उपस्थितीत सायंकाळी ६.३० ला महाआरती होणार आहे.

यावेळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते 'नाशिक - त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरण' ला रेकॉर्डचे प्रमाणपत्र प्रदान केले जाणार आहे. राष्ट्रपतींच्या हस्ते प्रमाणपत्र देण्याचा प्रसंग भारताच्या इतिहासात पहिलाच असेल, असाही दावा केला जात आहे. यापूर्वी ३ हजार ८०० महिलांनी आरती केल्याचा विदेशी विक्रम आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT