पंचवटी : तपोवनात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना नरेंद्राचार्य महाराज. समवेत महंत भक्तिचरणदास महाराज, ज्ञानदास महाराज, संजयदास महाराज, महंत मुरलीदास महाराज, सत्यदेवदास महाराज आदी. 
महाकुंभ

Simhastha kumbh mela nashik 2027-'साधुग्रामच्या जागेचा कायमस्वरूपी तोडगा काढा'

जगद्‌गुरू नरेंद्राचार्य महाराज यांची मागणी

स्वालिया न. शिकलगार

Simhastha Kumbh Mela Nashik 2027 Sadhugram Permanent Solution

पंचवटी : सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी साधुग्रामची जागा निश्चित असून, या जागेला कोणताही पर्याय असूच शकत नाही. ती जागा साधू-महंतांसाठी उपलब्ध करून देण्याबरोबरच दर १२ वर्षांनी निर्माण होणाऱ्या या प्रश्नावर प्रशासनाने कायमस्वरूपी तोडगा काढण्याची मागणी जगद्‌गुरू नरेंद्राचार्य महाराजांनी केली.

गुरुवारी (दि. २८) तपोवनामध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते म्हणाले की, कुंभमेळ्याचे धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व लक्षात घेता साधुग्रामची जागा अन्यत्र हलविणे शक्य नाही. त्यामुळे प्रशासनाने साधू महंतांसाठी ही जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी केली.

तपोवनातील वृक्षतोडीच्या मुद्द्यावर बोलताना ते म्हणाले की, झाडे वाचली पाहिजेत. कुंभमेळ्याच्या व्यवस्थापनासाठी आवश्यक विकासकामे करताना सरसकट वृक्षतोड करण्याऐवजी आवश्यक तेवढीच झाडे काढावीत, असा सल्ला त्यांनी दिला. दुष्काळाची परिस्थिती असताना धार्मिक विधींसाठी मोठ्या प्रमाणात पाणी उपलब्ध करून देण्याचा आग्रह साधू-संत धरणार नाहीत. उपलब्ध पाण्यातही धार्मिक विधी पार पाडता येतील. पाण्याच्या प्रश्नावरून आताच अनावश्यक चिंता करण्याची गरज नसल्याचे त्यांनी नमूद केले.

यावेळी ज्ञानदास महाराज, संजयदास महाराज, महंत मुरलीदास महाराज, महंत सत्यदेवदास महाराज, महंत नंदरामदास महाराज, महंत डॉ. महेशदास महाराज, महंत राजेशदास महाराज, महंत भक्तिचरणदास महाराज, महंत हेमंतदास महाराज उपस्थित होते.

'हिंदू धर्माचे प्रदर्शन करण्यात गैर काय ?'

कुंभमेळ्याचे होत असलेले इव्हेंट या प्रश्नावर त्यांनी सांगितले की, सोशल मीडियाच्या माध्यमातून हिंदू संस्कृती, धार्मिक परंपरा आणि विश्वबंधुत्वाचा विचार जगभर पोहोचविण्याची संधी मिळते. त्यामुळे कुंभमेळ्याच्या व्यापक प्रसिद्धीत गैर काहीच नाही, असे त्यांनी सांगितले.

गोदावरी प्रदूषण रोखण्याची गरज !

गोदावरी नदीपात्रात मिसळणारे सांडपाणी रोखण्यासाठी प्रशासनाने ठोस उपाययोजना कराव्यात. शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचा मोबदला न मिळणे ही प्रशासनाची चूक आहे. आपल्या हक्कासाठी शेतकऱ्यांनी न्यायालयात जाण्यात गैर काहीच नाही. गरज पडल्यास शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी संत-महंत मध्यस्थी करण्यास तयार आहेत, असे त्यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT