Kriti Sanon 
Latest

Kriti Sanon : कृती सेननचा नवीन लूक समोर

अनुराधा कोरवी

पुढारी ऑनलाईन : 'आदिपुरुष' चित्रपटाचा नवीन ऑडिओ टिझर रिलीज झाला आहे. यातून चित्रपटात सीतामातेच्या भूमिकेत असलेल्या कृती सेननचा नवीन लूक समोर आला आहे. नवमीचा मुहूर्त साधत हा नवीन ऑडिओ टीझर रीलिज करण्यात आला आहे.

अभिनेत्री कृती सेननने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा ऑडिओ टीझर शेअर केला आहे. याच्या कॅप्शनमध्ये सीतामातेचे वर्णन करण्यात आले आहे. कृतीने 'जय सियाराम' विविध सहा भाषांमध्ये लिहिले आहे. कृतीने शेअर केलेल्या एका पोस्टरमध्ये प्रभास श्रीरामांच्या भूमिकेत हातात धनुष्य घेऊन उभा दिसत आहे. रामायणावर आधारित या चित्रपटात प्रभास, कृती सेनन, देवदत्त नागे आणि सैफ अली खान मुख्य भूमिकेत आहेत.

रामनवमीच्या मुहूर्तावर श्रीरामाच्या भूमिकेतील प्रभासचे पोस्टर प्रदर्शित करण्यात आले होते. त्यानंतर हनुमान जयंतीच्या दिवशी चित्रपटातील हनुमानाचा लूक समोर आला होता. आता कृतीच्या पोस्टरने लक्ष वेधून घेतले आहे. हा चित्रपट येत्या १६ जूनला सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.

'आदिपुरुष' चित्रपटाच्या नवीन पोस्टरमध्ये कृती सीतामातेच्या भूमिकेत दिसत आहे. भगव्या रंगाची साडी तिने परिधान केली आहे. तिचे डोळेही थोडे पाणावलेले दिसत आहेत. विशेष म्हणजे, या पोस्टरमध्ये तिच्या भांगेत कुंकू दिसत आहे. यापूर्वी आदिपुरुष' चित्रपटाचे जे पोस्टर प्रदर्शित झाले होते, त्यात सीतामातेच्या भागेत कुंकू नसल्याचे नेटकल्यांनी निदर्शनास आणून दिले होते. आता नवीन मोशन पोस्टरमध्ये चूक सुधारली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT