Bollywood Star Diwali 
Latest

Bollywood Star Diwali : ‘या’ बॉलिवूड स्टार्सची दिवाळी दणक्यात

अनुराधा कोरवी

पुढारी ऑनलाईन डेस्क : देशभरात सर्वत्र दिवाळीची धामधूम पाहायला मिळत आहे. सर्वसामान्यापासून ते मराठी, बॉलिवूड आणि हॉलिवूड स्टार्सदेखील कोरोनानंतरची दिवाळी मोठ्या उत्साहात आणि धुमधडाक्यात साजरी करत आहेत. बघता-बघता दिवाळीच्या पाच दिवसांपैकी घनत्रयोदशी आणि बसूवारस हे दोन दिवस संपले आणि आज लक्ष्मी पूजनाचा दिवस उजेडला आहे. सकाळपासूनच मोठ्यापासून ते लहानापर्यंत सर्वजण दिवाळी सेलिब्रेशनमध्ये मग्न आहेत. याच दरम्यान बॉलिवूडमधील काही खास कलाकांरानी तिचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत चाहत्यांना दिवाळीच्या भरभरून शुभेच्छा दिल्या आहे. त्यामुळे पाहूयात असेच काही बॉलिवूड स्टार्स… (Bollywood Star Diwali )

क्रिती सेनॉन

बॉलिवूड अभिनेत्री क्रिती सेनॉन तिच्या इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर करून चाहत्यांना यंदाच्या दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी तिने खास करून तिने पिच रंगाच्या घागरा आणि चोळीमध्ये खूपच ग्लॅमरस दिसतेय. केसांची स्टाईल, कानात झुमके, मेकअप आणि लिपस्टिकने तिने लूक पूर्ण केला आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये तिने '?? P E A C H'. असे लिहिले आहे. क्रितीच्या या फोटोवर चाहत्यांनी तिला दिवाळीच्या शुभेच्छा देत कौतुकाचा वर्षाव केला आहे.

श्रद्धा कपूर

बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरने ऑरेंज कलरच्या लेहेंग्यामधील काही फोटो शेअर करत दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. केसांची स्टाईल, सिंपल मेकअप, कपाळावर टिकली आणि गळ्यात चोकर तिच्या सौंदर्यात भर पाडली होता. श्रद्धाने तिच्या ट्रॅडिशनल फोटोसोबत 'दिवाळी वर्षातून ३ वेळा का असू नये?' असी कॅप्शन लिहिली आहे. यानंतर नेटकऱ्या दिवाळीच्या शुभेच्चासोबत तिच्या फोटोवर कॉमेन्टसचा पाऊस पडत आहेत.

जान्हवी कपूर

बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूरने दिवाळीच्या निमित्ताने नुकतेच तिच्या इन्स्टाग्रामवर सिमर साडीमधील काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोच्या कॅप्शनमध्ये तिने 'Happy Diwali ? ?' असे लिहिले आहे. यावरून जान्हवीने तिच्या चाहत्यांना यंदाच्या दिवाळीच्या भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत.

ईशा गुप्ता

बॉलिवूडमध्ये अभिनयाची छाप पाडणारी अभिनेत्री ईशा गुप्ताने तिच्या चाहत्यांना काही फोटो शेअर करत दिवाळीच्या भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी डिझाईन केलेला रेड घागरा परिधान करून तिने चारचॉद लावले आहे. केसांची स्टाईल, कपाळावर टिकली, कानात कर्णफुले, गळ्यात मोत्याचे दोन हार आणि मेकअपने तिच्या सौदर्यांत भर गातली आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये तिने 'हर खुशी, खुशी मांगे आपसे, हर जिंदगी, जिंदगी मांगे आपसे, इतना उजाला हो आपके जीवन में, कि दिया भी रोशनी मांगे आपसे, दीपावली की शुभ कामनाएँ.' असे लिहिलं आहे.

अक्षय कुमार

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारने देखील त्याच्या इंन्स्टाग्रामवर एक पुजेचा व्हिडिओ शेअर करत दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. यात अक्षयसोबत अनेकांनी देवीची आरती करताना दिसतात. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये त्याने 'रोशनी, रंग और उनसे भी प्यारी मुस्कुराहटें. साल का मेरा सबसे अच्छा दिन!, आपको और आपके परिवार को मेरी और मेरे पूरे परिवार की ओर से दिवाली की हार्दिक शुभकामनाएं ?. #HappyDiwali?. असे म्हटलं आहे.

या सर्वा स्टार्ससोबत काही मोठ-मोठ्या स्टार्सनीदेखील दिवाळीच्या खास पार्टीचे आयोजन केले होते. यात एकता कपूर, शिल्पा शेट्टी, कृष्ण कुमार, आनंद पंडित यांनी दिवाळीच्या पार्टीचे आयोजन केलं होते. या खास क्षणाचे काही फोटो आणि व्हिडिओ विरल भयानी इंन्स्टाग्रामवर पाहायला मिळत आहेत. ( Bollywood Star Diwali )

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT