kranti redkar  
Latest

Kranti Redkar : अभिनेत्री क्रांती रेडकरला पाकिस्तानी क्रमांकावरून ठार मारण्याची धमकी

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : माजी एनसीबी अधिकारी समीर वानखेडेंची पत्नी आणि मराठी अभिनेत्री क्रांती रेडकरला जिवे मारण्याची धमकी देणारे फोन कॉल्स आणि मेसेज आले आहेत. (Kranti Redkar) पाकिस्तानी क्रमांकावरूनदेखील तिला अश्लिल मेसेज पाठवण्यात आले आहेत. अशी तक्रार क्रांतीने पोलिसात दिली आहे. एका वृत्तसंस्थेने या संदर्भातलं वृत्त दिले आहे. (Kranti Redkar)

यानंतर क्रांतीने ट्विटरवर पोस्ट लिहित सीएमओ, देवेंद्र फडणवीस आणि मुंबई पोलिसांना टॅग केलं आहे. तसे क्रांतीने या सगळ्या प्रकरणी स्क्रिन शॉट पोस्ट केले आहेत. तिने ट्विट मध्ये म्हटले आहे की, मला माझ्या मोबाईल नंबरवर विविध पाकिस्तानी नंबर आणि ब्रिटनमधील नंबरवरून जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. हे फक्त तुमच्या निदर्शनास आणून द्यायचे आहे ? हे गेल्या एक वर्षापासून होत आहे. पोलिसांना वेळोवेळी कळविण्यात आले. ?

एका वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, क्रांती रेडकरला ठार मारण्याच्या धमक्या या पाकिस्तानी क्रमांकावरुन आल्या आहेत. तसेच अश्लील मेसेजही पाठवण्यात आले आहे. क्रांतीने गोरेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

समीर वानखेडे एनसीबी अधिकारी असताना त्यांनी अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला ड्रग्ज प्रकरणात अटक केली होती. त्यानंतर समीर वानखेडेंवर गंभीर आरोपही झाले होते. पण वेळोवेळी क्रांती रेडकर उत्तरे देत पती समीर वानखेडेंची बाजू मांडत असे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT