पुणे: अल्पवयीन मुलगी बसने प्रवास करताना तिच्याबरोबर बोलण्याचा बहाणा करून मैत्री करशील का, अशी विचारणा करत तिला चहा पिण्याची ऑफर देणार्या तरुणाला कोथरूड पोलिसांनी बेड्या ठोकल्या. त्याच्यावर विनयभंग, बाललैंगिक अत्याचाराच्या कलमांनुसार गुन्हा दाखल झाला आहे. प्रेम चंदू पवार (29, रा. पिरंगुट, पोलिस चौकी शेजारी, घोटावडे फाटा) असे तरुणाचे नाव आहे. याबाबत 16 वर्षीय पीडित मुलीने फिर्याद दिली आहे. हा प्रकार 12 आणि 14 जानेवारीला रात्री दहा वाजण्याच्या सुमारास घडला. 12 जानेवारी रोजी मुलगी बसने प्रवास करत असताना आरोपी प्रेम पवार याने मुलीसोबत नळस्टॉपपासून कोथरूड डेपोदरम्यान बोलण्याचा प्रयत्न केला. तसेच माझ्यासोबत मैत्री करशील का, अशी विचारणा केली.