Kolhapur 
Latest

Kolhapur: मुलाने जीवन संपवले; २४ तासांत वडिलांचा देखील मृत्यू

मोनिका क्षीरसागर

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा; पट्टणकोडोली (ता. हातकणंगले) येथे मुलाच्या मृत्यूच्या धक्क्याने पित्याचा २४ तासांतच हृदयविकाराने मृत्यू झाला. विजय आनंदा परीट (वय ३२) या तरुणाने शौचालयाच्या पाईपला दोरीने गळफास घेऊन जीवन संपवल्याची घटना सोमवारी सायंकाळी घडली. ही घटना घडून २४ तास उलटण्याच्या आतच वडील आनंदा परीट (६०) यांचा मृत्यू झाला. लागोपाठ मुलगा व वडील यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

विजय कागल एमआयडीसीतील एका कंपनीत नोकरीला होता. तो काही दिवसांपासून तणावात होता. त्याने सोशल मीडियावर त्या आशयाचे स्टेटसही ठेवले होते. पण त्याच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. या घटनेला २४ तास उलटण्याआधीच वडील आनंदा परीट यांचेही हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. मुलगा व वडील यांच्या निधनामुळे गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. घटनेची वर्दी श्रीरंग परीट यांनी हुपरी पोलिसांत दिली आहे. अधिक तपास उपनिरीक्षक रावसाहेब हजारे करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT